Seo Services
Seo Services

सूक्ष्म-लघु उद्योग घटकांना पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन


मुंबई : सूक्ष्म व लघु उद्योग घटकांच्या उत्पादनाचा दर्जा उंचावण्यासाठी, स्पर्धात्मक क्षमतावृद्धीसाठी तसेच उद्योग घटकांना उत्तेजन देण्याच्या हेतूने सन 2018-19 या वर्षाकरिता पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन उद्योग विभागाने केले आहे.

अर्जदार उद्योग घटकाने सूक्ष्म अथवा लघु उद्योग उत्पादक घटक उद्योग आधार मेमोरॅण्डम प्राप्त केलेले असावे व घटकाचे उत्पादन तीन वर्षापासून अथवा त्यापूर्वी सुरु झालेले असावे. आवेदन पत्रामध्ये नमूद असलेल्या उत्पादित बाबींसाठी घटक हा मागील तीन वर्ष सलग उत्पादनामध्ये असावा. यापूर्वी राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय अथवा जिल्हा पुरस्कार प्राप्त झालेले घटक पुरस्कारासाठी पात्र ठरणार नाहीत. तसेच उद्योग घटक कोणत्याही बँकेचा थकबाकीदार नसावा.

अर्जाचा नमुना व इतर माहितीसाठी संबंधितांनी उद्योग सह संचालक (मुंप्रावि) यांचे कार्यालय, विकास सेंटर, 702, 7 वा मजला, सी गिडवाणी मार्ग, बसंत सिनेमागृहाजवळ, चेंबूर (पूर्व), मुंबई-400074 या पत्त्यावर संपर्क साधावा. तसेच या कार्यालयाचा दूरध्वनी क्र. 25208182/25206199 हा असून ई-मेलdidicmumbai@gmail.com असा आहे. अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख 31 मार्च 2019 ही आहे.
सूक्ष्म-लघु उद्योग घटकांना पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन सूक्ष्म-लघु उद्योग घटकांना पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन Reviewed by साप्ताहिक एकच ध्येय on March 16, 2019 Rating: 5

No comments:

ads 728x90 B
Powered by Blogger.