पिंपरी : संत तुकारामनगर येथील डॉ. डी. वाय. पाटील आयुर्वेद रुग्णालय व संशोधन केंद्राच्या वतीने 2 एप्रिल रोजी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात व्यसनाधीन व्यक्तींसाठी मोफत उपचार व सल्ला मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
व्यसनाधीन व्यक्तींमध्ये उपचारांबाबत जागरूकता निर्माण व्हावी तसेच विविध प्रकारच्या व्यसनांवर आयुर्वेदाद्वारे उपचार शक्य असल्याचा प्रचार व प्रसार व्हावा या उद्देशाने मोफत तपासणी शिबिराचे आयोजन केले गेले आहे. या शिबिरात डॉक्टरांच्या मार्गदर्शनाने तीन दिवसांची औषधे मोफत दिली जाणार आहेत.
हे शिबिर सकाळी 9 ते दुपारी 4 या वेळेत होईल. या शिबिराचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. प्रा. मेधा कुलकर्णी यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी जनसंपर्क अधिकारी भारती मराठे (8329152398) यांच्याशी संपर्क साधावा.
डॉ. डी. वाय. पाटील आयुर्वेद रुग्णालय व संशोधन केंद्राच्या वतीने मोफत आरोग्य तपासणी शिबिर
Reviewed by साप्ताहिक एकच ध्येय
on
March 30, 2019
Rating:
No comments: