Seo Services
Seo Services

व्यापार आणि आर्थिक सहकार्याबाबत युरोपीय आणि ओशियाना समूहातल्या देशांच्या राजदूत आणि उच्चायुक्तांसोबत संवाद सत्र



नवी दिल्लीयुरोपीय आणि ओशियाना समूहातले देश भारतासाठी महत्वाचे भागीदार आणि गुंतवणुकीसाठी महत्वाचे स्रोत आहे. आर्थिक बंध अधिक वृद्धिंगत होण्याची आवश्यकता वाणिज्य सचिव वाणिज्य सचिव डॉ. अनुप वाधवान यांनी व्यक्त केली आहे. नवी दिल्ली इथे काल युरोपिअन आणि ओशियाना समूहातल्या देशांच्या उच्चायुक्त आणि राजदुतांसोबत व्यापार आणि आर्थिक सहकार्याबाबत संवाद सत्र झाले. त्यावेळी ते बोलत होते.
वर्ष 2017-18 मध्ये भारताच्या युरोपसोबतचा व्यापार 130.1 अब्ज अमेरिकी डॉलर्सएवढा राहिला गुंतवणुकीमध्ये भारतातील एकूण परदेशी थेट गुंतवणुकीपैकी सुमारे एक चतुर्थांश वाटा युरोपचा आहे. तर भारताकडून परदेशात होणाऱ्या थेट गुंतवणुकीपैकी सुमारे 29.8 टक्के गुंतवणूक युरोपात होते.
ओशियाना गटातल्या देशांमधल्या कंपन्यांनी एप्रिल 2000 ते डिसेंबर 2018 या कालावधीत भारतात सुमारे 1034.2 दशलक्ष अमेरिकी डॉलर्सची गुंतवणूक केली आहे. भारताची एकूण परदेशी थेट गुंतवणुकीपैकी या देशांमधे सुमारे 1.7 टक्के गुंतवणूक आहे.
व्यापार आणि आर्थिक सहकार्याबाबत युरोपीय आणि ओशियाना समूहातल्या देशांच्या राजदूत आणि उच्चायुक्तांसोबत संवाद सत्र व्यापार आणि आर्थिक सहकार्याबाबत युरोपीय आणि ओशियाना समूहातल्या देशांच्या राजदूत आणि उच्चायुक्तांसोबत संवाद सत्र Reviewed by साप्ताहिक एकच ध्येय on March 29, 2019 Rating: 5

No comments:

ads 728x90 B
Powered by Blogger.