
मुंबई : राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी अश्वनी कुमार यांची आज अपर मुख्य सचिव पदावर पदोन्नती झाली.
अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे यांच्यासह सहमुख्य निवडणूक अधिकारी अनिल वळवी, उपमुख्य निवडणूक अधिकारी शिरीष मोहोड, उपमुख्य निवडणूक अधिकारी श्रीमती शुभा बोरकर यांनी पुष्पगुच्छ देऊन श्री. कुमार यांचे अभिनंदन केले.
अश्वनी कुमार हे भारतीय प्रशासन सेवेतील 1987 च्या बॅचचे अधिकारी आहेत. ते ऑगस्ट 2016 पासून प्रधान सचिव व राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी या पदावर कार्यरत आहेत. तत्पूर्वी ते महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाचे सचिव म्हणून कार्यरत होते. आज श्री. कुमार यांची प्रधान सचिव पदावरून अपर मुख्य सचिव पदावर पदोन्नती झाली. त्यांना प्रशासकीय सेवेचा 32 वर्षांचा दीर्घ अनुभव आहे.
मुख्य निवडणूक अधिकारी अश्वनी कुमार यांची अपर मुख्य सचिव पदावर पदोन्नती
Reviewed by साप्ताहिक एकच ध्येय
on
March 29, 2019
Rating:

No comments: