Seo Services
Seo Services

कर्तुत्ववान महिला पोलिस अधिकारी कर्मचारी यांच्या कार्याची दखल समाजाने घ्यावी

 


प्रतिनिधी दादाराव आढाव
             
 पिंपरी : राज्यातील कायदा सुव्यवस्था अबाधित रहावी, नागरिकांच्या जिवीताचे, स्थावर व जंगम मालमत्तेचे रक्षण व्हावे, यासाठी पोलिस बारा महिने चोविस तास दक्ष असतात. स्व:ताच्या कौटूंबिक जबाबदा-या सक्षमपणे पार पाडून कायद्याच्या रक्षणासाठी व सामाजिक स्वास्थ उत्तम रहावे या हेतूने पोलिस महिला कर्मचारी देखील अपार कष्ट करीत असतात. अशा महिला पोलिस कर्मचा-यांचा फक्त जागतिक महिला दिनाच्या दिवशीच सत्कार होण्याऐवजी नेहमीच त्यांच्या कार्याची व कर्तव्याची दखल समाजाने घेतली पाहिजे, असे प्रतिपादन पोलिस फ्रेन्डस्‌ वेलफेअर असोसिएशनचे अध्यक्ष गजानन चिंचवडे यांनी केले. 

पोलिस फ्रेन्डस्‌ वेलफेअर असोसिएशनच्या वतीने भोसरी पोलिस ठाणे आणि चिंचवड पोलिस ठाण्यात कार्यरत असणा-या महिला पोलिस अधिकारी व कर्मचा-यांचा सत्कार जागतिक महिला दिनानिमित्त करण्यात आला. यावेळी भोसरी पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक पांडूरंग गोफणे, चिंचवड पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक भीमराव शिंगाडे व विश्वजीत खुळे, पिंपरी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक रंगनाथ उंडे,पोलीस  उपनिरीक्षक संतोष डोलारे, उत्कर्ष देशमुख, महिला पोलीस कर्मचारी कविता खरात, आरती निकम, स्वाती शिर्के, मनिषा कालेकर. तसेच कार्यक्रमाचे संयोजक व पोलिस फ्रेन्डस्‌ वेलफेअर असोसिएशनचे अध्यक्ष गजानन चिंचवडे, नगरसेवक माऊली थोरात, शुभम चिंचवडे, प्रकाश जवळकर, किरण गांधी, निखील येवले, सागर पाचारणे, गणेश कटारनवरे, संपत बोराटे, सागर पुंढे, ॲड. पंजाब इंगळे, विशाल शर्मा, राजू कांगणे, शादाब पठाण, हेमंत दुराफे, अवधूत डांगे, निखील कलाटे आदी उपस्थित होते.
कर्तुत्ववान महिला पोलिस अधिकारी कर्मचारी यांच्या कार्याची दखल समाजाने घ्यावी कर्तुत्ववान महिला पोलिस अधिकारी कर्मचारी यांच्या कार्याची दखल समाजाने घ्यावी Reviewed by साप्ताहिक एकच ध्येय on March 11, 2019 Rating: 5

No comments:

ads 728x90 B
Powered by Blogger.