Seo Services
Seo Services

आदर्श आचारसंहिता लागू; शासकीय वाहने जमा

Related image


पिंपरी : देशातील निवडणुकांच्या तारखांची घोषणा केंद्रीय निवडणूक आयोगाने रविवारी सायंकाळी केली. निवडणुकांच्या घोषणेबरोबरच आदर्श आचारसंहिता लागू झाल्याने महापालिकेतील पदाधिका-यांनी शासकीय वाहने जमा करणे बंधनकारक आहे.

महापालिकेतील महापौर, उपमहापौर, स्थायी समिती सभापती, विरोधी पक्षनेता, विविध विषय समित्यांच्या सभापतींच्या वापरात शासकीय वाहने आहेत. या पदाधिका-यांना शासकीय वाहने जमा करणे बंधनकारक आहे.

निवडणुकीची घोषणा होताच पिंपरी-चिंचवड शहराचे महापौर राहुल जाधव महापालिका मुख्यालयात दाखल झाले.

त्यांनी आपल्या वापरातील शासकीय वाहन जमा केले. त्यानंतर दुचाकीवरुन महापौर जाधव घरी रवाना झाले. निवडणूक आचारसंहिता संपेपर्यंत किमान दोन महिने पदाधिका-यांच्या सरकारी वाहन वापरावर निर्बंध आहेत.
आदर्श आचारसंहिता लागू; शासकीय वाहने जमा आदर्श आचारसंहिता लागू; शासकीय वाहने जमा Reviewed by साप्ताहिक एकच ध्येय on March 11, 2019 Rating: 5

No comments:

ads 728x90 B
Powered by Blogger.