Seo Services
Seo Services

आशियाई नेमबाजी स्पर्धा : भारतीय नेमबाजांना एक सुवर्ण आणि दोन रौप्य





नवी दिल्ली : तैपेईमधील ताओयुआन येथे सुरू असलेल्या आशियाई एअरगन अजिंक्यपद स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी भारतीय नेमबाजांनी एक सुवर्ण आणि दोन रौप्यपदकांची कमाई केली.

रवी कुमार आणि ईलाव्हेनिल व्हालारिव्हान जोडीने १० मीटर एअर रायफल मिश्र सांघिक प्रकारात रौप्यपदक मिळवले. पात्रता फेरीत रवी आणि ईलाव्हेनिल यांनी ८३७.१ गुणांसह आघाडी मिळवली होती. मात्र पाच संघांचा समावेश असलेल्या अंतिम फेरीत पार्क सुनमिन आणि शिन मिन्की या कोरियाच्या जोडीने त्यांच्यावर सरशी साधली. कोरियाने ४९९.६ गुणांसह सुवर्णपदक मिळवले, भारतीय जोडीच्या खात्यावर ४९८.४ गुण जमा होते. चायनीज तैपेईच्या जोडीला कांस्यपदक मिळाले. दीपक कुमार आणि अपूर्वी चंडेला या दुसऱ्या भारतीय जोडीला चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले.

कनिष्ठ गटामधील १० मीटर एअर रायफल मिश्र सांघिक प्रकारात दोन संघांनी अंतिम फेरीत स्थान मिळवले. मेहुली घोष आणि केवल प्रजापती जोडीने सर्वाधिक ८३८.५ गुणांसह पात्रता फेरी गाठली, तर श्रेया अग्रवाल आणि यश वर्धन यांना ८३१.२ गुणांसह दुसरे स्थान मिळाले.

अंतिम फेरीत श्रेया आणि यशने ०.४ गुणांच्या फरकाने सुवर्णपदकावर नाव कोरले. अंतिम सहा फैरी बाकी असताना मेहुली आणि केवल जोडीकडे १.६ गुणांची आघाडी होती. मात्र अखेरच्या टप्प्यात श्रेया-यश जोडीने ४९७.३ गुणांसह मेहुली-केवल (४९६.९ गुण) जोडीवर मात केली. कोरियाच्या जोडीला कांस्यपदक मिळाले.
आशियाई नेमबाजी स्पर्धा : भारतीय नेमबाजांना एक सुवर्ण आणि दोन रौप्य आशियाई नेमबाजी स्पर्धा : भारतीय नेमबाजांना एक सुवर्ण आणि दोन रौप्य Reviewed by साप्ताहिक एकच ध्येय on March 29, 2019 Rating: 5

No comments:

ads 728x90 B
Powered by Blogger.