माझ्या देशप्रेमावर कोणी शंका घेऊ शकत नाही, असे वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. एकाच कुटुंबातील चार पिढी गरिबीवर चर्चा करत आली आहे. याच लोकांनी ५५ वर्षे देशावर राज्य केले. आज पुन्हा ते गरिबीवर बोलत आहेत.
त्यांनी आता गरिबांसाठीची योजना जाहीर केली आहे. त्यांचे सरकार येणार नाही, हे त्यांना माहीत आहे. त्यामुळेच ते असे बोलत आहेत. गांधी कुटुंबीय पुन्हा कधीच सत्तेवर येणार नाही, असे भाकीत मोदींनी केले आहे.
‘रिपब्लिक टीव्ही’ला मुलाखत देताना त्यांनी आपल्या पाच वर्षांच्या कारकीर्दीवर प्रकाश टाकला. तसेच विविध प्रश्नांची उत्तरे दिले. पूर्वीच्या सरकारला (तत्कालीन यूपीए सरकार) संरक्षण करार म्हणजे एटीएम होते, असा आरोप करत देशातील जनतेने मला बहुमताने सत्ता देण्याचा निर्णय घेतला असल्याचे म्हटले आहे. २०१४ च्या तुलनेत विरोधक यावेळी जास्त विखुरले असल्याचेही ते म्हणाले.
गांधी कुटुंबीय पुन्हा कधीच सत्तेवर येणार नाही - नरेंद्र मोदी
Reviewed by साप्ताहिक एकच ध्येय
on
March 29, 2019
Rating:
No comments: