Seo Services
Seo Services

रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये महिलादिन साजरा


अजूनही महिलांनी प्रगतीच्या दिशा घेणं गरजेचं आहे

वसुधा महेश लोंढे

भोसरी : महिला दिनाच्या निमीत्ताने भोसरी येथील रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये महिलादिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमास अनेक महिला पालक, शिक्षक, शिक्षिका, विद्यार्थी, विद्यार्थिंनी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे अध्यक्ष असो. ऑफ स्मॉल & मिडीयम न्यूज पेपर्स ऑफ इंडिया या संघटनेचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष श्री. शशिकांत डांगे होते. महिलांनी अनेक क्षेत्रात प्रगती केलेली असून, सामाजिक व औद्योगिक क्षेत्रामध्ये त्यांनी प्रगतीच्या दिशा घेणे गरजेचं आहे, असे मत त्यांनी आपल्या भाषणामध्ये यावेळी व्यक्त केले. या प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक श्री. कैलास गिरमकरसर यांनी शिक्षिका व महिलांचा सत्कार गुलाबपुष्प व असो. ऑफ स्मॉल & मिडीयम न्यूज पेपर्स ऑफ इंडिया संघटेनेच्या पुणे जिल्ह्याच्या वतीने शुभेच्छापत्र व श्यामची आई हे पुस्तक देवून कौतूक केलं, तसेच या कार्यक्रमास "एकच ध्येय" या साप्ताहिकाचे संपादक व समता समाज सेवा प्रतिष्ठानाचे अध्यक्ष (महाराष्ट्र राज्य) श्री. महेश आनंदा लोंढे, दै. प्रभातचे प्रतिनिधी चौधरी साहेब, सौ. पालखेडे मॅडम, सौ. गव्हाणे मॅडम, सौ. खैरणार मॅडम, देवकी कदम मॅडम व महिला वर्ग उपस्थित होते. या कार्यकमाच्या निमित्ताने शाळेच्या विद्यार्थींनी महिला संघर्षाची अनेक छोटी छोटी नाट्य सादर केली. या कार्यक्रमाची प्रस्तावना या शाळेची विद्यार्थिंनी कु. मनोकामना चव्हाणनी केली, तर मनोगत मुख्याध्यापक श्री .गिरमकर सर, सौ. पालखेडे मॅडम, चौधरी साहेब, टुंडे सर यांनी व्यक्त केले, तर आभार सुषमा झांजूरे मॅडम यानी मानले. या कार्यक्रमाचे खुपच छान प्रकारे सूत्रसंचालन कु. मनोकामना चव्हाण विद्यार्थिनीने केलं.

रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये महिलादिन साजरा रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये महिलादिन साजरा Reviewed by साप्ताहिक एकच ध्येय on March 08, 2019 Rating: 5

No comments:

ads 728x90 B
Powered by Blogger.