Seo Services
Seo Services

गतिशीलतेवरील उपाययोजनांना चालना



Image result for पंतप्रधान नरेंद्र मोदी


परिवर्तनीय गतिशीलता आणि बॅटरी साठाविषयक राष्ट्रीय अभियानाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

गतीशीलतेसाठी स्वच्छ, संपर्कयुक्त आणि सर्वसमावेशक उपक्रमांना प्रोत्साहन देणारे अभियान

बॅटरी आणि इलेक्ट्रिक व्हेईकलच्या सुट्या भागांसाठी टप्याटप्याने उत्पादन कार्यक्रम राबवणार

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत खालील उपक्रमांना मंजुरी मिळाली.
१. गतीशीलतेसाठी स्वच्छसंपर्कयुक्त,शाश्वत आणि सर्वसमावेशक उपक्रमांना प्रोत्साहन देण्याच्या हेतूने परिवर्तनीय गतिशीलता आणि बॅटरी साठाविषयक राष्ट्रीय अभियानाला’ मंजुरी देण्यात आली.

२.  या अभियानाअंतर्गतपाच वर्षांसाठी म्हणजेच 2024 पर्यत बॅटरी आणि इलेक्ट्रिक व्हेईकलच्या सुट्या भागांसाठी टप्याटप्याने उत्पादन कार्यक्रम राबवला जाणारा असूनमोठ्यानिर्यातक्षम इंटिग्रेटेड बॅटरीज आणि सेल-उत्पादक गिगा प्लांट्सच्या निर्मितीला सर्वतोपरी मदत केली जाणार.

३.     टप्याटप्याने उत्पादन कार्यक्रम वर्षे सुरु राहणार असून त्या अंतर्गत संपूर्ण इलेक्ट्रिक व्हेईकल मूल्यसाखळीत स्थानिक उत्पादनांना प्रोत्साहन दिले जाणार आहे.

४.    टप्याटप्याने उत्पादन कार्यक्रमविषयक दोन्ही योजना, ‘परिवर्तनीय गतिशीलता आणि बॅटरी साठाविषयक राष्ट्रीय अभियानाअंतर्गत’ निश्चित केल्या जातील.

परिवर्तनीय गतिशीलता आणि बॅटरी साठाविषयक राष्ट्रीय अभियान
रचना :
·    या बहुशाखीय परिवर्तनीय गतिशीलता आणि बॅटरी साठाविषयक राष्ट्रीय अभियानात आंतर-मंत्रालयीन सुकाणू समितीचा समावेश असेल आणि नीती आयोगाचे कार्यकारी अधिकारी समितीचे अध्यक्ष असतील.
·    या सुकाणू समितीत रस्ते वाहतूकउर्जानवीन आणि अक्षय ऊर्जा,विज्ञान व तंत्रज्ञानअवजड उद्योगउद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभाग या सर्व विभागांचे सचिव आणि औद्योगिक मानक विभागाचे महासंचालक यांचा समावेश असेल.

भूमिका :
·    हे अभियान परिवर्तनीय गतिशीलता आणि इलेक्ट्रिक व्हेईकल आणि त्याचे सुटे भाग याविषयीच्या टप्याटप्याने उत्पादन कार्यक्रम योजनांची शिफारस करून त्याला गती देईल. 
·     टप्याटप्याने उत्पादन कार्यक्रम योजना इलेक्ट्रिक वाहन मूल्यसाखळीत स्थानिक उत्पादकांना प्रोत्साहन देण्यासाठी सुरु केली जाईल. या अभियानाअंतर्गत त्यासाठीची रूपरेषा आखली जाईल.
·    ह्या अभियानाअंतर्गत संबंधित मंत्रालयविभागांमधील महत्वाच्या हितसंबंधी गटांमध्ये समन्वय राखला जाईल.

आराखडा:
·   जागतिक स्तरावर स्पर्धात्मक मल्टीमॉडेल मोबिलिटी सोल्युशन्सच्या व्यवसायात भारतीय कंपन्यांना समर्थपणे उतरवण्यासाठी ह्या अभियानाअंतर्गत एक सुस्पष्ट आराखडा तयार केला जाईल. या कार्यक्रमाअंतर्गत देशातील इंटिग्रेटेड बॅटरीज आणि सेल-उत्पादक गिगा प्लांट्सच्या निर्मितीला चालना मिळेल. परिवर्तनीय गतिशीलतेच्या माध्यमातून नव्या भारताची निर्मिती करण्याचा आराखडाही बनवला जाईल.

प्रभाव :
·    मोबिलिटी सोल्युशन्सच्या व्यवसायातील समस्यांवर या अभियानाअंतर्गत उपाययोजना शोधल्या जातील. ज्याचा लाभ उद्योगअर्थव्यवस्था आणि पर्यायाने देशालाही होईल.
·    इलेक्ट्रिक वाहनांना चालना मिळाल्यामुळे वाहनांसाठीचे तेल इंधनावरील अवलंबित्व कमी होईल.
·   या अभियामामुळे सर्वसामान्य जनतेचे जीवनमान सुधारेलतसेच रोजगाराच्या संधी देखील उपलब्ध होतील.
गतिशीलतेवरील उपाययोजनांना चालना गतिशीलतेवरील उपाययोजनांना चालना Reviewed by साप्ताहिक एकच ध्येय on March 08, 2019 Rating: 5

No comments:

ads 728x90 B
Powered by Blogger.