Seo Services
Seo Services

नव्या औद्योगिक धोरण पुस्तिकेचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशन


सामान्य तरुणांच्या हाताला काम देणारे धोरण - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस


मुंबई : नव्या औद्योगिक धोरणामुळे ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था बनण्याच्या दृष्टीने महाराष्ट्राची घोडदौड सुरु झाली असून सामान्य तरुणांच्या हाताला काम देणारे धोरण असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

हॉटेल ट्रायडंट येथे आयोजित नवे औद्योगिक धोरण पुस्तिका 2019’ आणिउद्योग वैभव’ या कॉफी टेबल बुकच्या प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी उद्योगमंत्री सुभाष देसाईउद्योग राज्यमंत्री प्रवीण पोटे-पाटीलशिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणालेया नव्या उद्योग धोरणामुळे सुक्ष्म व लघु मध्यम उपक्रमांना चालना मिळणार असून संशोधन व विकास कार्यक्रमांना गती मिळणार आहे. तसेच मैत्री कक्षाचे सक्षमीकरण करण्यात आले असून मोठ्या व विशाल प्रकल्पांना प्रोत्साहन देण्यात आले आहे. राज्याचे 2025 पर्यंत ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था होण्याचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी आणि सर्व उद्योग क्षेत्रामध्ये गुंतवणुकीची सुवर्ण संधी प्राप्त करुन देण्यासाठी महाराष्ट्र राज्य परिश्रम घेत आहे. मेक इन इंडिया आणि मॅग्नेटिक महाराष्ट्र या उद्योग परिषदांमुळे राज्यात सर्वाधिक परकीय थेट गुंतवणूक मोठ्या प्रमाणात झाली. त्यामुळे तरुण वर्गाला मोठ्या प्रमाणात रोजगार मिळाला. या परिषदांमुळे मोठ्या प्रमाणात रोजगारनिर्मिती करणेकृषी उत्पादन वाढविणेफलोत्पादन वाढविणेशेतकऱ्यांचे जीवनमान उंचावणे यासाठी नवीन धोरणात सुधारणा करण्यात आल्या. पायाभूत सुविधांचा विकासनवीन उद्योजकांना प्रोत्साहन आणि कौशल्य विकास प्रशिक्षणाद्वारे कुशल रोजगारक्षम मनुष्यबळाची निर्मिती करणे हे या नव्या धोरणाचे प्रमुख उद्दिष्ट आहे. या नव्या धोरणामुळेच महाराष्ट्र उद्योग क्षेत्रात आघाडीवर राहणार आहे.

गेल्या चार वर्षात देश विदेशातील अनेक उद्योग समूहांना भेटी देऊन उद्योगपतींशी चर्चा करुन महाराष्ट्रात गुंतवणूक आणण्याचे काम सरकारने केले आहे. त्यामुळे गेल्या 8-10 वर्षांत इतर राज्यांपेक्षा मागे असलेला महाराष्ट्र आज उद्योग क्षेत्रात अग्रेसर आहे. हे नवे धोरण अतिशय पारदर्शीउद्योगवाढीस प्रोत्साहन देणारे असून त्यामुळे उद्योग जगताचा चेहरामोहरा बदलणार आहे. नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गामुळे मोठ्या प्रमाणात औद्योगिक उलाढाल होणार असून महाराष्ट्र 20 वर्ष पुढे जाणार आहे. कृषी क्षेत्राचा मोठा विकास होऊन शेतकऱ्यांच्या जीवनात समृद्धी येणार आहेअसे सांगून ते म्हणाले, ‘मुख्यमंत्री रोजगारनिर्मिती कार्यक्रमामुळे 40 लाख तरुणांच्या हाताला काम मिळणार असून ग्रामीण भागातील भूमीपुत्रांना रोजगार मिळवून देणारे असे हे सर्वसमावेशक धोरण आहे. याचवेळी त्यांनी उद्योग विभागाने उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल उद्योगमंत्री सुभाष देसाई आणि उद्योग विभागाच्या सर्व अधिकाऱ्यांचे कौतुक केले.

उद्योगमंत्री श्री.देसाई म्हणालेउद्योग विभागाने देशातील उत्तम उद्योग धोरण तयार केले आहे. सर्व उद्योजकांना उपयुक्त ठरणारे हे धोरण असून पुढच्या पाच वर्षांत नवी औद्योगिक क्रांती झालेली पहायला मिळेल. कोकणातील सिंधुदूर्गमध्ये नव्याने विमानतळ सुरु झाले आहे. त्यामुळे तेथे मोठ्या प्रमाणात उद्योगधंदे येऊन तेथील अर्थव्यवस्था बळकट होण्यास मदत होणार आहे. नवी मुंबईत भारतातील पहिले ज्वेलरी पार्क सुरु झाले आहे. तेथे 14 हजार कोटींची गुंतवणूक अपेक्ष‍ित आहे. त्याचबरोबर एक लाख लोकांना रोजगार निर्माण होणार आहे.

श्री.ठाकरे म्हणालेनव्या औद्योगिक धोरणांचा फायदा बेरोजगारांना होऊन त्यांच्या हाताला काम मिळाले पाहिजे. या नवीन उद्योग धोरणामुळे महाराष्ट्राच्या विकासाचे विमान उंच भरारी घेईल.

प्रारंभी उद्योग विकास आयुक्त हर्षदीप कांबळे यांनी नवीन उद्योग धोरणाचे सादरीकरण केले. त्यानंतर मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांच्या हस्ते नवे उद्योग धोरण पुस्तिकेचे तर उद्योग वैभव या कॉफीटेबल बुकचे प्रकाशन श्री.ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. याच कार्यक्रमात भू मागणी विनंती पोर्टलचा शुभारंभ श्री.देसाई यांच्या हस्ते करण्यात आला.

भारतातील जर्मनीचे वाणिज्य प्रतिनिधी डॉ.मोझदार यांनी इन्डो-जर्मन उद्योगासंदर्भात बोलताना महाराष्ट्रात चांगल्या सोयी सुविधा उपलब्ध असल्याने मोठ्या प्रमाणात उद्योग सुरु झाल्याचे सांगितले. तर उद्योगपती पियुष खंबाटा यांनी महाराष्ट्राचे उद्योग धोरण उद्योगवाढीला पोषक असल्याचे सांगून मुख्यमंत्री नेहमीच उद्योजकांना प्रोत्साहन देत असल्याचे सांगितले. शेवटी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पी. अनबलगन यांनी आभार मानले. या कार्यक्रमाला मंत्रिमंडळातील सदस्यआमदारविविध देशातील राजदूतवाणिज्य प्रतिनिधी,उद्योजक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नव्या औद्योगिक धोरण पुस्तिकेचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशन नव्या औद्योगिक धोरण पुस्तिकेचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशन Reviewed by साप्ताहिक एकच ध्येय on March 06, 2019 Rating: 5

No comments:

ads 728x90 B
Powered by Blogger.