मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी मतदान न केल्यास बँक खात्यामधून 350 रुपये वजा होणार असल्याची बातमी पूर्णतः चुकीची असून या बातमीवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने केले आहे.
सध्या समाज माध्यमांवर ही माहिती व्हायरल झाली असून ती तथ्यहीन आहे. एखाद्या व्यक्तिने मतदान न केल्यास त्याच्या खात्यातून पैसे वजा करण्याची बँकांना ताकीद देण्यात आल्याची माहितीही चुकीची आहे. तसेच बँक खाते नसलेल्या मतदारांकडून मोबाईल फोनचे रिचार्ज करताना 350 रुपये वसूल केले जाणार असल्याची माहितीही तथ्यहीन आहे. नागरिकांनी अशा बातम्यांवर विश्वास ठेवू नये, तसेच अशा बातम्या समाज माध्यमांवर फाॅरवर्ड करु नये, असे आवाहन मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने केले आहे.
तथापि, मतदान करणे हे प्रत्येक नागरीकाचे कर्तव्य असून मतदार यादीत नाव असलेल्या प्रत्येक नागरीकाने लोकसभा निवडणुकीसाठी अवश्य मतदान करावे,असे आवाहनही या कार्यालयाने केले आहे.
मतदान न केल्यास बँक खात्यामधून पैसे वजा होणार असल्याची बातमी चुकीची; विश्वास न ठेवण्याचे आवाहन
Reviewed by साप्ताहिक एकच ध्येय
on
March 22, 2019
Rating:
No comments: