मुंबई : देशाच्या अर्थव्यवस्थेत भारतीय दागिने उद्योगाची महत्त्वाची भूमिका असल्याचे केंद्रीय वाणिज्य, उद्योग आणि नागरी हवाई वाहतूक मंत्री सुरेश प्रभू यांनी सांगितले. सकल राष्ट्रीय उत्पादनात या क्षेत्राचा वाटा 7 टक्के तर विक्री निर्यातीत 14 टक्के असून या क्षेत्रात 50 लाख कामगार असल्याचे ते म्हणाले. या क्षेत्रात नव कल्पना याव्यात, जागतिक बाजारपेठेतील पुरवठा यासंदर्भात पोषक वातावरण तयार करणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले. नवी मुंबईत इंडिया ज्वेलरी पार्कच्या भूमीपूजन समारंभात ते आज बोलत होते.
दागिने उद्योग सध्या असलेल्या 42 अब्ज अमेरिकन डॉलर्स निर्यातीपासून 2025 पर्यंत 75 अब्जचे निर्यात लक्ष्य/उद्दिष्ट साध्य करेल असा विश्वास प्रभू यांनी व्यक्त केला.
इंडिया ज्वेलरी पार्क हा एकीकृत उद्योग पार्क असून येथे एकाच छताखाली सर्व सुविधा उपलब्ध आहेत. या ठिकाणी निर्मिती कारखाने, व्यापारी क्षेत्र, औद्योगिक कामगारांसाठी निवासस्थान आणि व्यापारी आधारभूत सेवा उपलब्ध असतील.
मुंबईतून मौल्यवान रत्ने आणि दागिन्यांची 28320.98 दशलक्ष अमेरिकन डॉलर्स एवढी सर्वाधिक निर्यात होत असून ही निर्यात एकूण भारतीय निर्यातीच्या 69 टक्के आहे. या पहिल्या वहिल्या ज्वेलरी पार्कमुळे राज्यातील दागिने उद्योगाचा कायापालट होईल, असे विश्वास महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
या पार्कमुळे या क्षेत्रात 3 लाख रोजगार निर्मित होतील, असे फडणवीस म्हणाले. प्रकल्पाच्या ठिकाणी एक खिडकी प्रणाली देण्यात येईल, असे त्यांनी आश्वासन दिले. जेम ॲण्ड ज्वेलरी विद्यापीठासाठी सर्व ती मदत दिली जाईल. तसेच प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत कारागिरांना घरं उपलब्ध करून दिली जातील असे त्यांनी सांगितले.
मुंबईतील इंडिया ज्वेलरी पार्क हा जेम ॲण्ड ज्वेलरी एक्सपोर्ट प्रमोशन काऊंसिलचा प्रकल्प आहे. या प्रकल्पाची जमीन, इमारत आदींसाठी 14 हजार 467 कोटी रुपये एकूण गुंतवणूक अपेक्षित असून सध्याच्या स्थितीत 41467.50 कोटी रुपयांची वार्षिक उलाढाल अपेक्षित आहे. या उलाढालींपैकी मोठा हिस्सा निर्यातीचा असेल. इंडिया ज्वेलरी पार्कमुळे उत्पादन, गुंतवणूक, निर्यात वाढीला तसेच महाराष्ट्र आणि भारताच्या एकूण आर्थिक विकासाला चालना मिळेल.
महाराष्ट्राचे उद्योगमंत्री सुभाष देसाई, जेम ॲण्ड ज्वेलरी एक्सपोर्ट प्रमोशन कौन्सिल अर्थात जीजेइपीसीचे अध्यक्ष प्रमोद कुमार अग्रवाल आदी यावेळी उपस्थित होते.
केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाअंतर्गत 1966 मध्ये जीजेईपीसीची स्थापना करण्यात आली असून ही जेम्स आणि ज्वेलरी उद्योगाची शिखर संस्था आहे. आज ही संस्था या क्षेत्रातल्या 6 हजार 800 निर्यातदारांचे प्रतिनिधीत्व करते. या संस्थेचे मुख्य कार्यालय मुंबईत असून नवी दिल्ली, कोलकाता, चेन्नई, सुरत आणि जयपूर येथे विभागीय कार्यालये आहेत.
देशातला पहिला-वहिला इंडिया ज्वेलरी पार्क लवकरच नवी मुंबईत होणार सुरू
Reviewed by साप्ताहिक एकच ध्येय
on
March 06, 2019
Rating:
No comments: