Seo Services
Seo Services

संशयास्पद व्यवहारांची माहिती प्रशासनाला द्या; जिल्हाधिकाऱ्यांच्या बॅंक अधिकारी यांच्या बैठकीत सूचना


Related image


सोलापूर : लोकसभा निवडणुकीच्या कालावधीत कोणत्याही संशयास्पद व्यवहाराची तत्काळ माहिती जिल्हा प्रशासनास द्यावी, अशा सूचना जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी बँक अधिकाऱ्यांना दिल्या.

राष्ट्रीयीकृत बँकेच्या जिल्ह्यातील सर्व अधिकाऱ्यांची आज सेतू सभागृहात बैठक झाली. त्यात त्यांनी सूचना दिल्या. या बैठकीला अतिरिक्त जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी अजित देशमुख, उपजिल्हा निवडणूक अधिकारी स्नेहल भोसले, खर्च सनियंत्रण समितीचे समन्वय अधिकारी महेश अवताडे, सहाय्यक अधिकारी राहुल कदम , अग्रणी बँक व्यवस्थापक रामचंद्र चंदनशिवे, नाबार्डचे जिल्हा व्यवस्थापक प्रदीप झिले आदी उपस्थित होते.

डॉ. भोसले यांनी सांगितले की, संशयास्पद व्यवहाराबरोबरच एक लाख रुपयांपेक्षा जास्त रक्कम एखाद्या खात्यात जमा केली गेल्यास त्याची माहिती द्यावी. त्याचबरोबर उमेदवारांने अर्जात नमूद केलेल्या नातेवाईकांच्या खात्यामधून एक लाख रुपयांपेक्षा अधिक रक्कमेचे व्यवहार झाल्यास त्याची माहिती कळवावी. त्याचबरोबर निवडणूक काळात उमेदवारांना जलद सेवा देता यावी यासाठी विशेष कक्ष स्थापन करावा, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.

श्री. अवताडे यांनी यावेळी निवडणूक कालावधीत बँकेच्या अधिकारी-कर्मचारी यांनी काय काळजी घ्यावी, याबाबत माहिती दिली. 
संशयास्पद व्यवहारांची माहिती प्रशासनाला द्या; जिल्हाधिकाऱ्यांच्या बॅंक अधिकारी यांच्या बैठकीत सूचना संशयास्पद व्यवहारांची माहिती प्रशासनाला द्या; जिल्हाधिकाऱ्यांच्या बॅंक अधिकारी यांच्या बैठकीत सूचना Reviewed by साप्ताहिक एकच ध्येय on March 14, 2019 Rating: 5

No comments:

ads 728x90 B
Powered by Blogger.