Seo Services
Seo Services

प्रतिभासंपन्न गीतकार ग.दि.माडगूळकर यांच्या जन्मशताब्दी निमित्ताने विशेष कार्यक्रमांचे आयोजन




मुंबई : महाराष्ट्राचे प्रतिभासंपन्न विख्यात महाकवी, ईश्वरीय प्रतिभा लाभलेले पटकथासंवाद लेखक व गीतकार ग.दि.माडगूळकर यांचे सन 2018-19 हे जन्मशताब्दी वर्ष आहे. सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने गदिमांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्ताने त्यांना मानवंदना देण्यासाठी त्यांचे जीवनावर आधारित छायाचित्रपेटींग्जऑडिओ-व्हीडिओसांस्कृतिक कार्यक्रम तसेच चित्र प्रदर्शनाच्या माध्यमातून जन्मशताब्दी महोत्सवाचे दि. 26 ते 30 मार्च 2019 या कालावधीत आर्ट मंडळललित महाल चौकफर्ग्युसन कॉलेज रोड तसेच टिळक स्मारक मंदिर आणि महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी ऑडिटोरियमकोथरुड या ठिकाणी आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्याचे उद्घाटन महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे अध्यक्ष व संत साहित्याचे अभ्यासक डॉ.सदानंद मोरे व महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष तथा लेखकव्याख्याते प्रा.मिलिंद जोशी यांच्या हस्ते दि. 26 मार्च 2019 रोजी सायं.6.30 वाजता आर्ट मंडलललित महाल चौकफर्ग्युसन कॉलेज रोडपुणे येथे होणार आहे. साहित्य व सांस्कृतिक जगतातील मानबिंदू असलेल्या या शब्दमहर्षिंचा प्रवास या महोत्सवाच्या माध्यमातून उलगडला जाणार आहे. दि.27 मार्च रोजीमहाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी ऑडिटोरियमकोथरुड येथे संवादसेतू, पुणे निर्मित ʻगदिमायनʼ या कार्यक्रमाचे सादरीकरण होणार आहे.

या कार्यक्रमाला जोडूनच टिळक स्मारक मंदिरपुणे येथे दररोज संध्याकाळी सहा वाजल्यापासून इतर सर्व सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न होणार आहेत. दि. 28 मार्च2019 रोजी आदित्य बिवलकररघुलीला एंटरप्रायजेस निर्मित ʻगीतरामायणʼ, दि.29 मार्च रोजी प्रकाश पारखीनाट्य संस्कार कला अकादमी निर्मित ʻनाच रे मोराʼ, दि. 30 मार्च रोजी सौ.प्राजक्ता माडगूळकरगदिमा साहित्य अकादमी निर्मित ʻतो राजहंस एकʼ या सांस्कृतिक कार्यक्रमांची सर्व रसिक प्रेक्षकांना मेजवानी मिळणार आहे. दि.27 मार्च रोजी गदिमांनी अभिनय केलेल्या तसेच कथा,पटकथा व गीतांना साथ दिलेल्या वऱ्हाडी व वाजंत्रीदि.28 मार्च रोजी सुवासिनी तसेच दि. 29 मार्च रोजी जगाच्या पाठीवर या चित्रपटांचा महोत्सव आर्ट मंडळललित महाल चौकएच.डी.एफ.सी बँक नेफर्ग्यूसन कॉलेज रोड,पुणे येथे रोज दु.3.30 वाजता होणार आहे. 


अद्वितीय प्रतिभा व शब्दप्रभुत्वाच्या साहाय्याने गीतरामायणासारखा दर्जेदार नजराणा पेश करणारे व आजही मराठी रसिकांच्या मनात अढळ स्थान असलेले श्रेष्ठ कवीगीतकारपटकथालेखककादंबरीकार अशा विविध स्वरुपात ग.दि.माडगूळकर यांची ओळख मराठी साहित्य क्षेत्रात आहे.  या शब्दमहर्षिंच्या जीवनावर आधारित दि.26 ते 30 मार्च या कालावधीत दुपारी.12 ते रात्रौ.8वाजेपर्यंत आर्ट मंडळललित महाल चौकएच.डी.एफ.सी बँक नेफर्ग्यूसन कॉलेज रोड, पुणे येथे चित्रांकीत आलेख दर्शविणाऱ्या चित्रांचे प्रदर्शन तसेच याच कालावधीत याच ठिकाणी नामवंत लेखकांच्या दर्जेदार साहित्यांचे प्रदर्शन या महोत्सवाच्या निमित्ताने मांडले जाणार आहे. जन्मशताब्दीच्या निमित्ताने गदिमांच्या आठवणींना पुन्हा एकदा उजाळा मिळणार असल्याने कार्यक्रमांसाठी व प्रदर्शनासाठी प्रवेश विनामूल्य असून सर्वरसिक प्रेक्षकांना या कार्यक्रमांना आवर्जून उपस्थित राहण्याचे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या संचालक श्रीमती स्वाती काळे यांनी केले आहे.
प्रतिभासंपन्न गीतकार ग.दि.माडगूळकर यांच्या जन्मशताब्दी निमित्ताने विशेष कार्यक्रमांचे आयोजन प्रतिभासंपन्न गीतकार ग.दि.माडगूळकर यांच्या जन्मशताब्दी निमित्ताने विशेष कार्यक्रमांचे आयोजन Reviewed by साप्ताहिक एकच ध्येय on March 24, 2019 Rating: 5

No comments:

ads 728x90 B
Powered by Blogger.