Seo Services
Seo Services

एसटी महामंडळाच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ

Related image


मूंबई : देशातील सर्वात मोठे प्रवासी महामंडळ असलेल्या एसटी महामंडळाच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होत आहे. व्यवस्थापनाच्या नियोजनशून्य कारभारामुळे एसटीच्या रोजच्या प्रवासी संख्येत कमालीची घसरण होत आहे. अपघातांचे प्रमाण वाढणे, कंत्राटी शिवशाही मालकांची अरेरावी, पूर्वसूचना न देता एसटी फेऱ्या रद्द करणे या कारणांमुळे एसटीची रोजची प्रवासी संख्या नऊ महिन्यांमध्ये ७० लाखांवरून सुमारे ५८ लाखांपर्यंत घसरल्याचे दिसून येत आहे. 

एसटीच्या तिकीट दरात प्रवाशांना २५ टक्के ते १०० टक्के सवलत देण्यात येते. सद्यस्थितीत अशा २६ प्रकारच्या सवलती एसटीमध्ये दिल्या जातात. मात्र कर्मचाऱ्यांकडून सवलतधारकांना अयोग्य वागणूक मिळते. प्रवासीपूरक योजना केवळ कागदावरच आहेत. यामुळे एसटीतील हक्काचा प्रवासी दुरावला जात असल्याची माहिती एसटीतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नाव न छापण्याच्या अटीवर दिली. 
...तर प्रवासीवाढीची शक्यता 

प्रवासी वाढवा योजना, सवलतधारकांसाठी स्मार्ट कार्ड योजना, अवैध खासगी वाहतुकीवर निर्बंध, जेनेरिक औषधालय या आणि अन्य योजनांची योग्य अंमलबजावणी केल्यास एसटीच्या प्रवासी संख्येत वाढ होण्याची शक्यता एसटी अधिकाऱ्यांनी वर्तवली आहे. 

सवलतधारकांचीही एसटीकडे पाठ 

राज्य शासनाकडून एसटी महामंडळाला सवलतधारक प्रवाशांसाठी शेकडो कोटींचा निधी देण्यात येतो. मात्र २०१८ मध्ये सवलतधारकांनीच एसटी प्रवासाला नापसंती दर्शवली. २०१८ मध्ये सवलतधारक प्रवासी टक्केवारी ६८.८६ इतकी नोंदवण्यात आली असून २०१७ मध्ये सवलतधारक प्रवाशांचा टक्का ७०.६२ इतका होता, असे एसटीच्या तुलनात्मक अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे. याचबरोबर विनासवलत प्रवाशांचा टक्का ५६.३७ वरून घसरून ५४.६० वर स्थिरावला आहे. 

लेखापरीक्षणासाठी तयार केलेल्या एसटी महामंडळातील तुलनात्मक अहवालानुसार, एप्रिल ते डिसेंबर २०१७ च्या तुलनेत एप्रिल ते डिसेंबर २०१८ या कालावधीत बहुतांश प्रवाशांनी एसटीला नापसंती दर्शवली आहे. एप्रिल ते डिसेंबर २०१८ या काळात एकूण १७७.५० कोटी प्रवाशांची वाहतूक करण्यात आली. तर, २०१७ मध्ये प्रवासी संख्या १८२.९७ कोटी इतकी होती. 
एसटी महामंडळाच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ एसटी महामंडळाच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ Reviewed by साप्ताहिक एकच ध्येय on March 24, 2019 Rating: 5

No comments:

ads 728x90 B
Powered by Blogger.