.jpg)
अमरावती : मतदान जागृतीसाठी स्वीप मोहीम दि. १५ एप्रिलपर्यंत चालणार असून विविध यंत्रणांच्या सहभागाद्वारे कार्यक्रमाला गती देण्यात आली आहे. विविध शाळांतून स्काऊट आणि गाईड विद्यार्थ्यांचा मोठा सहभाग मिळाला आहे.
स्वीप कार्यक्रम भरीवपणे राबविण्याचे निर्देश जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी दिले आहेत. त्यानुसार स्वीपच्या नोडल अधिकारी तथा जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा खत्री यांनी सर्व यंत्रणांमध्ये समन्वय साधून कामाला गती दिली आहे. बेलपुऱ्यातील न्यू हायस्कूलमध्ये स्काऊट आणि गाईडच्या माध्यमातून मतदार जनजागृतीचा कार्यक्रम झाला. शिक्षणाधिकारी निलिमा टाके यांनी मार्गदर्शन केले. जिल्हा संघटन आयुक्त रमेश जाधव व वैशाली घोम उपस्थित होते. पथनाट्य, पोवाडा आणि संवादातून मतदान जागृती करण्यात आली.
निंभोऱ्याच्या शासकीय मुलांच्या वसतिगृहात समाजकल्याण सहायक आयुक्त मंगला मून यांच्या उपस्थितीत कार्यक्रम झाला. जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे डॉ. चेतन जाधव उपस्थित होते. उमेदवारांनी कोणत्याही आमिषाला बळी न पडता निर्भयपणे मतदान करण्याचे आवाहन श्रीमती मून यांनी केले. देशाला महासत्ता बनविण्यासाठी नागरिकांनी मतदार म्हणून मतदानाचे महत्व जाणून घेतले पाहिजे व मतदान करून लोकशाही समृद्ध करण्यात योगदान दिले पाहिजे, असे यावेळी डॉ. जाधव म्हणाले.

अमरावती जिल्ह्यात स्वीप मोहिमेला गती स्काऊट आणि गाईडचा मोहिमेत सहभाग
Reviewed by साप्ताहिक एकच ध्येय
on
March 30, 2019
Rating:
No comments: