मुंबई : लोकसभा निवडणूक प्रक्रियेत सुसूत्रता आणि अधिकाधिक मतदारांच्या उपयुक्ततेसाठी भारतीय निवडणूक आयोगाने १९५० ही हेल्पलाइन कार्यान्वित केली आहे. या हेल्पलाइन अंतर्गत १५ मदत केंद्रे कार्यरत असून त्यामुळे मतदारांना कधीही माहिती सहज मिळण्यास मदत होत आहे.
आचारसंहिता लागल्याच्या कालावधीपासून या हेल्पलाइनवर दररोज विचारणा केली जात आहे. कॉल येत आहेत.याद्वारे मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी सर्वाधिक मार्गदर्शन विचारण्यात आले आहे. २४ तास सुरु असणारी ही हेल्पलाइन सर्व जिल्ह्यात सुरु करण्यात आली आहे. याद्वारे मतदारांच्या विविध तक्रारींचे निवारण केले जाते.
हेल्पलाइनची वैशिष्ट्ये
• नागरिकांना निवडणूक आणि मतदानासंबंधीची माहिती वेळोवेळी देणे
• नवीन मतदार नोंदणीसोबतच मतदारांच्या विविध शंकांबाबत मार्गदर्शन
• मतदान ओळखपत्रात बदल किंवा स्थलांतर झाले असल्यास मतदान यादीत नाव नोंदवायचे असल्यास काय करावे याबाबतही मार्गदर्शन
• मतदान ओळखपत्र व मतदान अर्जाशी निगडित सर्व माहिती उपलब्ध
• मराठी, हिंदी व इंग्रजी अशा तीनही भाषांमधून माहिती
• निवडणूक संदर्भातील कोणत्याही प्रकारची तक्रार ceo.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर नोंदविता येईल.
• राज्यस्तरावर राज्य संपर्क केंद्र (State Contact Centre) तसेच जिल्हास्तरावर जिल्हा संपर्क केंद्र (District Contact Centre)स्थापन
या हेल्पलाइनच्या सहाय्याने मतदार नोंदणीसाठी संबंधितांना अधिकृत माहिती मिळविणे सोपे झाले आहे. मतदार यादीतील त्यांच्या वैयक्तिक माहितीचे तपशील,मतदान केंद्र, बूथ लेव्हल अधिकारी,निवडणूक नोंदणी अधिकारी आणि जिल्हा निवडणूक अधिकारी यांचे संपर्क क्रमांक याविषयीची माहिती मतदार हेल्पलाइन मोबाइल अॅप किंवा www.nvsp.in पोर्टल किंवा १९५० हेल्पलाइनवर फोन करून मिळविता येत आहे.
१९५० या हेल्पलाईनवर पुढीलप्रमाणे माहिती मिळविता येते :
(i) ECI <EPIC Number> <0 (इंग्रजीमध्ये उत्तरासाठी) किंवा (प्रादेशिक भाषेत उत्तरासाठी) <1.
(ii) ECIPS <EPIC NUMBER>असे केल्यास EPIC नंबर मतदाराला मतदान केंद्राचा पत्ता मिळेल.
(iii)ECICONTACT <EPIC NUMBER> हे मतदारांना बूथ लेव्हल ऑफिसर्स,निवडणूक नोंदणी अधिकारी आणि जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्या संपर्क तपशीलांसह उत्तर देतील.
मतदारांच्या मदतीला १९५० क्रमांकाची हेल्पलाइन
Reviewed by साप्ताहिक एकच ध्येय
on
March 21, 2019
Rating:
No comments: