आचारसंहिता भंगाच्या ७१७ तक्रारी ॲपवर, २९४ तक्रारींवर कार्यवाही
मुंबई : नागरिकांना आचारसंहिता भंगाच्या तक्रारी ऑनलाईन दाखल करता याव्यात यासाठी निवडणूक आयोगाने उपलब्ध करुन दिलेले सी व्हिजिल (cVigil) मोबाइल ॲप प्रभावी ठरले आहे. या ॲपवर ७१७ तक्रारी दाखल झाल्या असून त्यापैकी तथ्य आढळलेल्या २९४ तक्रारींवर कार्यवाही करण्यात आली आहे.
पोस्टर, बॅनर संदर्भातील सर्वाधिक तक्रारी
ॲपवर प्राप्त तक्रारींपैकी आचारसंहिता भंग झाल्याच्या तक्रारींवर तात्काळ कार्यवाही करण्यात आली. 36 तक्रारींवर कार्यवाही सुरु आहे, तर 387 तक्रारी ह्या आचारसंहितेशी संबंधित नसल्याने त्यावर कार्यवाही करण्यात आली नाही. प्राप्त तक्रारींपैकी सर्वाधिक 230 तक्रारी ह्या विनापरवाना लावण्यात आलेले पोस्टर,बॅनर संदर्भातील आहेत. संपत्ती विद्रुपीकरण 44, शस्त्रप्रदर्शन किंवा दहशतीचे वातावरण 7, भेटवस्तू किंवा कुपनचे वाटप 22, मद्याचे वाटप 18, पैशाचे वाटप 38,पेड न्यूज 41, धार्मिक किंवा सामाजिक भाषण 3, प्रचारफेरीसाठी नागरिकांची वाहतूक 5, निर्धारीत वेळेनंतर ध्वनिक्षेपकाचा वापर 5 तर विनापरवाना वाहनांचा वापर याबाबत 19 तक्रारी ॲपवर नोंदवण्यात आल्या.
ॲपच्या सहाय्याने सर्वाधिक 133 तक्रारी पुणे जिल्ह्यातून नोंदवण्यात आल्या. त्या खालोखाल ठाणे 68, सोलापूर 61, मुंबई उपनगर 45 तर मुंबई शहर येथे 41तक्रारी दाखल झाल्या आहेत. नांदेड जिल्ह्यात 36, अहमदनगर 35, अकोला 11,अमरावती 11, औरंगाबाद 12, बीड 8, भंडारा 2, बुलढाणा 13, चंद्रपूर 3, धुळे 2,गडचिरोली 2, गोंदीया 3, हिंगोली 7, जळगाव 20, जालना 1, कोल्हापूर 18, लातूर11, नागपूर 30, नंदूरबार 2, नाशिक 22, उस्मानाबाद 8, पालघर 24, परभणी 7,रायगड 8, रत्नागिरी 4, सांगली 17, सातारा 11, सिंधुदुर्ग 19, वर्धा 14, वाशिम 6तर यवतमाळ जिल्ह्यातून 2 तक्रारी नोंदवण्यात आल्या.
आचारसंहितेचे उल्लंघन झाल्याचे आढळल्यास सी व्हिजिल ॲपच्या माध्यमातून थेट ऑनलाइन तक्रार करण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. कॅमेरा, इंटरनेट कनेक्शन आणि जीपीएस सुविधा असलेल्या स्मार्टफोनद्वारे या ॲपच्या माध्यमातून तक्रार करता येते. आदर्श आचारसंहिता भंग होत असल्याचे वाटल्यास नागरिक त्या घटनेचे छायाचित्र किंवा 2 ते 3 मिनिटांचा व्हिडिओ रेकॉर्ड करुन ॲपवर टाकू शकतात. अॅप वापरकर्त्यास आपली ओळख लपवून तक्रार नोंदविण्याचा पर्यायही उपलब्ध आहे. या प्रणालीस नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.
सी व्हिजिल मोबाईल ॲप हे डाऊनलोडसाठी गुगल प्ले स्टोअर तसेच ॲपल स्टोअरवर उपलब्ध आहे. ॲपवर तक्रार अपलोड केल्यापासून साधारण दीड तासात तक्रारीची स्थिती तक्रारकर्त्याला प्राप्त होते. त्यानंतर तक्रार योग्य असल्यास त्या तक्रारकर्त्याच्या मोबाइलवर तसा संदेश प्राप्त होतो. मतदारांना पैसा, मद्य, अंमली पदार्थांचे वाटप करणे, शस्त्रसाठा अथवा शस्त्रवापर, मतदारांना मारहाण, दमबाजी, चिथावणीखोर भाषण, पेड न्यूज, फेकन्यूज, मतदारांना आमिष म्हणून वस्तूंचा वापर, मतदान केंद्रापर्यंत मतदारांची मोफत वाहतूक,उमेदवाराची मालमत्ता आदी विविध प्रकारच्या आचारसंहिता भंगाच्या प्रकरणात सी व्हिजिल मोबाईल ॲपवर तक्रार करता येते.
‘सी व्हिजिल’ॲपच्या माध्यमातून नागरिकांची नजर
Reviewed by साप्ताहिक एकच ध्येय
on
March 21, 2019
Rating:
No comments: