Seo Services
Seo Services

उडाण योजनेंतर्गत रत्नागिरी विमानतळासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ आणि भारतीय विमानतळ प्राधिकरण यांदरम्यान सामंजस्य करार

 Image result for नागरी विमानतळ

सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी विमानतळाद्वारे कोकण क्षेत्रातील पर्यटन

 आणि आर्थिक विकासासाठी पूर्ण वचनबद्ध - श्री सुरेश प्रभू

मुंबईरत्नागिरी नागरी विमानतळ तयार करण्यासाठी संरक्षण मंत्रालय, महाराष्ट्र राज्य सरकार आणि भारतीय विमानतळ प्राधिकरण सारख्या सर्व भागधारकांशी बोलणी करून उडान योजनेच्या प्रादेशिक वाहतूक योजनेंतर्गत रत्नागिरी विमानतळास सक्रिय करण्यात येणार आहे. आरसीएस ऑपरेशन्स सुरू करण्यासाठी पॅसेंजर टर्मिनल, ऍप्रॉन आणि टॅक्सीवे तयार करणे तसेच विमान आणि प्रवाशांना हाताळण्यासाठी आधारभूत सुविधा प्रदान करण्यासाठी एम आय डी सी कार्यरत राहणार आहे.
या प्रसंगी बोलताना श्री सुरेश प्रभु यांनी सांगितले की, "आम्ही रत्नागिरी येथून लवकर विमान सेवा सुरु करण्यासाठी पूर्ण वचनबद्ध आहोत. रत्नागिरी-मुंबई-रत्नागिरी मार्गावर हवाई वाहतुकीसाठी उडान 3.1 अंतर्गत निविदा मागवल्या गेल्या आहेत. नागरी टर्मिनल बांधण्याचे काम आणि नेव्हीगेशन सुविधांच्या स्थापनेची कार्यवाही करण्यासाठी भारतीय विमानतळ प्राधिकरण आणि महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी) यांच्यात सामंजस्य करारावर  स्वाक्षरी केली जाणार आहे. आम्ही कोकणच्या विकासासाठी बांधील आहोत आणि त्यासाठी लवकरात लवकर विमान सेवा सुरु करण्यासाठी प्रयत्नशील आहोत. कोकण क्षेत्रातील पर्यटन व अर्थव्यवस्था वाढवण्यासाठी सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी हे दोन्ही विमानतळ कार्य्रन्वित करणार असून या मुळे नक्कीच कोकणाचा विकास होईल”
उडाण योजनेंतर्गत रत्नागिरी विमानतळासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ आणि भारतीय विमानतळ प्राधिकरण यांदरम्यान सामंजस्य करार उडाण योजनेंतर्गत रत्नागिरी विमानतळासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ आणि भारतीय विमानतळ प्राधिकरण यांदरम्यान सामंजस्य करार Reviewed by साप्ताहिक एकच ध्येय on March 05, 2019 Rating: 5

No comments:

ads 728x90 B
Powered by Blogger.