Seo Services
Seo Services

महाकुंभ म्हणजे भव्यता-दिव्यता-पवित्रता यांचा त्रिवेणी संगम- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस



मुंबई : महाशिवरात्रीच्या पावन पर्वावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सकाळी उत्तरप्रदेशातील प्रयागराज येथे महाकुंभमेळ्यात त्रिवेणी संगमावर पवित्र स्नान केले. भव्यतादिव्यता आणि सर्वात महत्वाचे म्हणजे पवित्रता याठिकाणी अनुभवायला येत आहेअशी भावना मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी माध्यम प्रतिनिधींशी बोलताना व्यक्त केली.

मुख्यमंत्री यावेळी म्हणाले कीप्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी मांडलेली नवभारताची संकल्पना प्रत्यक्ष साकार करणारे हे आयोजन आहे. येथील गंगामाता व यमुनामाता यांचे रुप अतिशय मनोहारी आणि परिवर्तनाची साक्ष देणारे आहे. यासाठी मी उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे मनापासून अभिनंदन करतो. भाविकांमध्ये दिसणारा प्रचंड उत्साह आणि वंदे मातरमच्या घोषणांनी येथील वातावरण पूर्णपणे भारावून टाकले आहे. कोट्यवधी भारतीयांची आस्था या महाकुंभासोबत जोडली गेली आहेत्यांनाही मी शुभेच्छा देतोअसेही मुख्यमंत्री म्हणाले.

स्वच्छतेमुळे व चोख व्यवस्थेमुळे हा महाकुंभ जगातील सर्वात मोठा आस्थेचा मेळावा म्हणून ओळखला जाईलअसेही ते म्हणाले.

प्रयागराज येथे मुख्यमंत्र्यांसोबत केंद्रीय आरोग्य व कुटुंबकल्याण राज्यमंत्री अश्विनी कुमार चौबेराज्याचे पर्यटनमंत्री जयकुमार रावल उपस्थित होते.
महाकुंभ म्हणजे भव्यता-दिव्यता-पवित्रता यांचा त्रिवेणी संगम- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महाकुंभ म्हणजे भव्यता-दिव्यता-पवित्रता यांचा त्रिवेणी संगम- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस Reviewed by साप्ताहिक एकच ध्येय on March 05, 2019 Rating: 5

No comments:

ads 728x90 B
Powered by Blogger.