देशातील ९१ मतदारसंघांमध्ये अधिसूचना जारी होणार
लोकसभा निवडणुकीची प्रत्यक्ष प्रक्रिया सुरू होत असून, देशातील ९१ मतदारसंघांमध्ये निवडणुकीची अधिसूचना जारी होणार आहे. राज्यातील सात मतदारसंघांमध्ये उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात होणार आहे.
लोकसभा निवडणूक सात टप्प्यांत होणार असून, ११ एप्रिलला पहिल्या टप्प्यात मतदान होणार असलेल्या देशातील ९१ मतदारसंघांतील निवडणूक प्रक्रियेची अधिसूचना जारी केली जाईल. १८ ते २५ मार्च या काळात उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत असून, २६ तारखेला अर्जाची छाननी केली जाईल. उमेदवारी अर्ज माघार घेण्याची मुदत २८ तारखेपर्यंत आहे. देशातील २० राज्यांमधील ९१ मतदारसंघांमध्ये पहिल्या टप्प्यात मतदान होणार आहे.
पहिल्या टप्प्यातील निवडणुकीत विदर्भातील सात मतदारसंघांचा समावेश आहे. नागपूर, वर्धा, रामटेक, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर आणि यवतमाळ-वाशिम या सात मतदारसंघांमध्ये ११ एप्रिलला मतदान होणार आहे.
१८ ते २५ मार्च या काळात उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत
Reviewed by साप्ताहिक एकच ध्येय
on
March 18, 2019
Rating:
No comments: