पिंपरी - चिखली येथे एसएसपी शिक्षण संस्थेतर्फे ज्येष्ठ समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांचा सावित्री पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. या वेळी सत्काराला उत्तर देताना त्या म्हणाल्या, की गरिबीत लाजू नका. श्रीमंती आली तर माजू नका. प्रत्येकाच्या आयुष्यात वाटेवर काटे असतात. तुमच्याही वाटेत आहेत. काट्यांशी मैत्री करा, काटे बोचले तरी सहन करा. संकटांवर मात करा आणि तुमच्याकडे येणाऱ्या सर्वांच्या दु:खावर प्रेमाने फुंकर घाला, असा जगण्याचा सल्ला ज्येष्ठ समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांनी दिला.
चिखलीतील नेवाळे वस्ती येथील एसएसपी शिक्षण संस्थेच्या गणेश इंटरनॅशनल स्कूलच्या वतीने दिला जाणारा पहिला 'सावित्री पुरस्कार' देऊन सिंधूताई सपकाळ यांना सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमास संस्थेचे संस्थापक अध्यक्ष एस. बी. पाटील, नगरसेविका स्वीनल म्हेत्रे, हर्षदा साने, प्राची मळेकर, गणेश पाटील, आकाश पाटील, मंगेश पाटील, स्नेहल पाटील, प्राचार्या सोफियाबानो इनामदार, शाळेचे प्रशासकीय अधिकारी प्रकाश गायकवाड, सल्लागार रितू गुळवणी, व्यवस्थापक सुनील शेवाळे, दापोडी येथील गणेश स्कूलचे प्राचार्य दत्तात्रय घारे, माजी प्रशिक्षण अधिकारी हरी भारती, राजेश व्हटकर आदींसह पालक, विद्यार्थी उपस्थित होते.
ज्येष्ठ समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांचा सावित्री पुरस्कार देऊन सन्मान
Reviewed by साप्ताहिक एकच ध्येय
on
March 20, 2019
Rating:
No comments: