Seo Services
Seo Services

मावळमधील डान्सबारमध्ये गोळीबार; पीएसआय जखमी,"दोन आरोपी ताब्यात"

Image result for गोळीबार


प्रतिनिधी दादाराव आढाव

मावळ : पुणे जिल्ह्यातल्या मावळ येथील डान्सबारमध्ये दोन गटात वाद झाल्याने गोळीबार झाल्याचे वृत्त आहे. दरम्यान, हा वाद सोडवण्यासाठी गेलेले पोलीस उपनिरिक्षक यामध्ये जखमी झाले आहेत.

पोलिसांच्या माहितीनुसार, मावळमधील प्रसिद्ध फ्लेवर्स डान्स बारमध्ये बिल देण्यावरून दोन गटात प्रचंड वाद झाल्याने एकाला मारहाण करत गोळीबार करण्यात आला, अशी प्राथमिक माहिती मिळते. ही घटना शुक्रवारी (दि.८) मध्यरात्री १२ वाजण्याच्या सुमारास घडली. दरम्यान, भांडण सोडविण्यासाठी गेलेले पोलीस उपनिरिक्षक नितीन मोहिते यांच्या पायावर काहींनी अचानक गोळी झाडल्याने ते जखमी झाले आहेत. त्यांच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

गोळीबार करणाऱ्यांच्या गटामध्ये ५ ते ६ जण असून यांपैकी २ आरोपींना पोलिसांनी पिस्तुलासह ताब्यात घेतले आहे. या  आरोपींवर वडगाव मावळ पोलिसांत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. या घटनेचा अधिक तपास वडगाव मावळ पोलीस करीत आहेत. राज्य सरकारने डान्सबारवरील बंदी उठवल्यानंतर बारमधील कार्यक्रमा दरम्यान अशा प्रकारे गुन्हेगारी कृत्य घडल्याची ही पहिलीच घटना आहे.
मावळमधील डान्सबारमध्ये गोळीबार; पीएसआय जखमी,"दोन आरोपी ताब्यात"  मावळमधील डान्सबारमध्ये गोळीबार; पीएसआय जखमी,"दोन आरोपी ताब्यात" Reviewed by साप्ताहिक एकच ध्येय on March 09, 2019 Rating: 5

No comments:

ads 728x90 B
Powered by Blogger.