244 व्हीलचेअर्स 20 तीनचाकी सायकल उपलब्ध
रत्नागिरी : जिल्ह्यात असणाऱ्या 4396 दिव्यांग व्यक्तींना मतदान करणे शक्य व्हावे यासाठी निवडणूक विभाग सज्ज असून या कामासाठी 244 व्हीलचेअर्स आणि 20 तीनचाकी सायकलचा वापर केला जाणार आहे, अशी माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी दिली आहे.
मतदानाचे प्रमाण वाढावे यासाठी मोठया प्रमाणात प्रयत्न सुरु आहेत. या अंतर्गत ज्या केंद्रांवर दिव्यांग मतदार आहेत. या अंतर्गत ज्या केंद्रावर दिव्यांग मतदार आहेत अशा केंद्रांना स्वत: जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी पाहणी केली होती. दिव्यांग तसेच ज्येष्ठ मतदारांना यावेळी PWD या ॲपद्वारे नोंदणी करुन मतदानासाठी जाण्याची सोय उपलब्ध करुन देण्यात आली आहे.
या सर्व दिव्यांग मतदारांप्रमाणेच ज्येष्ठ मतदारांना रांगेशिवाय थेट मतदान करता येणार आहे. ज्येष्ठ मतदारांना मतदान केंद्रावर आणणे व परत घरी सोडणे यासाठी स्वतंत्र वाहने ठेवण्यात आली आहेत. दिव्यांगांना केंद्रात जाणे शक्य व्हावे यासाठी उद्योजकांना जिल्हाधिकारी चव्हाण यांनी आवाहन केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत लोटे औद्योगिक वसाहतीमधील उद्योजकांनी 200 व्हीलचेअर प्रशासनाकडे सूपूर्द केल्या आहेत. याबाबत जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी उद्योजकांचे विशेष आभार मानले आहेत.
मतदार संघातील दिव्यांगांची संख्या
३ to ४ PWD Polling Center
|
Total PWD
|
५ to above PWD Polling Center
|
Total PWD
|
All Total PWD
| |
रत्नागिरी
|
40
|
135
|
78
|
638
|
773
|
राजापूर
|
81
|
282
|
105
|
805
|
1087
|
गुहागर
|
74
|
252
|
93
|
658
|
910
|
दापोली
|
44
|
148
|
46
|
317
|
465
|
चिपळूण
|
83
|
298
|
114
|
863
|
1161
|
322
|
1115
|
436
|
3281
|
4396
|
या 200 व्हीलचअर्स सोबत रत्नागिरी नगरपरिषदेने 44 व्हीलचेअर्स खरेदी केल्या त्यामुळे एकूण 244 व्हीलचेअर्स प्रशासनाकडे उपलब्ध आहे. या सोबतच सामाजिक न्याय विभागाच्या 20 तीनचाकी सायकली यासाठी वापरल्या जातील.
या सर्वांमुळे जिल्ह्यातील 758 मतदान केंद्रावर असणाऱ्या 4396 दिव्यांग मतदारांना मतदान करणे सूलभ होईल, असा विश्वास जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी व्यक्त केला आहे.
जिल्ह्यात 4396 दिव्यांगांची मतदानाची बिकट वाट आता सुलभ होणार - सुनील चव्हाण
Reviewed by साप्ताहिक एकच ध्येय
on
April 17, 2019
Rating:
No comments: