Seo Services
Seo Services

एलईडी स्क्रीनद्वारे मतदार जागृती - मुख्य कार्यकारी अधिकारी गौडा यांची अभिनव कल्पना


नंदुरबार : जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांच्या अभिनव संकल्पनेतून जिल्हा परिषद आणि पंचायत समिती परिसरात एलईडी स्क्रीनद्वारे मतदार जागृतीचे संदेश देण्यात येत आहेत.

जिल्हा परिषदेच्या माध्यमातून नागरिकांसाठी विविध कल्याणकारी योजना राबविण्यात येतात. या योजना नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी विविध माध्यमांद्वारे प्रसिद्धीदेखील करण्यात येते. प्रसिद्धीवर होणारा खर्च योग्यरितीने व्हावा आणि त्यातून चांगला परिणाम साधता यावा यासाठी श्री.गौडा यांनी जिल्हा परिषद आवारात एलईडी स्क्रीन बसविण्याचा निर्णय घेतला.

जिल्हा परिषद इमारतीच्या दर्शनी भागात ही स्क्रीन बसविण्यात आल्याने ती चटकन नागरिकांचे लक्ष वेधते. स्क्रीनचा आकार 14 बाय 10 फूट एवढा मोठा असल्याने त्यावरील संदेशही स्पष्टपणे वाचता येतात. जिल्हा परिषदेच्या माहिती तंत्रज्ञान कक्षाकडून या स्क्रीनचे नियंत्रण करण्यात येत आहे.

लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर मतदार जागृतीसाठी स्क्रीनचा कल्पकतेने उपयोग करून घेण्यात येत आहेत. स्क्रीनच्या माध्यमातून नागरिकांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी आवाहन करण्यात येत आहे. त्याचबरोबर मतदान केंद्रावर मतदारांसाठी करण्यात येणाऱ्या सुविधा, दिव्यांग मतदारांसाठीच्या विशेष सुविधा आदी विविध पैलूंविषयी माहिती प्रदर्शित करण्यात येत आहे.

एलईडी स्क्रीनला मिळणारा प्रतिसाद लक्षात घेऊन येत्या काळात पंचायत समिती स्तरावर स्क्रीन उभारण्यात येतील, अशी माहिती उप मुख्य कार्यकारी अधिकारी सारीका बारी यांनी दिली. लोकसभा निवडणूकीनंतर जिल्हा परिषदेच्या विविध योजनादेखील स्क्रीनवर प्रदर्शित करण्यात येणार आहेत.
एलईडी स्क्रीनद्वारे मतदार जागृती - मुख्य कार्यकारी अधिकारी गौडा यांची अभिनव कल्पना एलईडी स्क्रीनद्वारे मतदार जागृती - मुख्य कार्यकारी अधिकारी गौडा यांची अभिनव कल्पना Reviewed by साप्ताहिक एकच ध्येय on April 17, 2019 Rating: 5

No comments:

ads 728x90 B
Powered by Blogger.