नवी दिल्ली : पॅनकार्ड, आधारकार्डशी लिंक करण्याची मुदत रविवारी संपत असतानाच ती आणखी सहा महिन्यांनी वाढविण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. ही मुदत 31 मार्च रोजी संपणार होती. मात्र आता ती 30 सप्टेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे.
करदात्यांनी आपापली पॅनकार्ड आपल्या आधारकार्डशी संलग्न करणे गरजेचे आहे. काही करदात्यांनी अजून ही दोन्ही कार्ड संलग्न केलेली नाहीत. त्यामुळे ही मुदत वाढवणे गरजेचे असल्याचे आयकर विभागाने स्पष्ट केले. गेल्या वर्षी जुलैमध्ये आयकर विभागाने पॅनकार्ड आणि आधारकार्ड लिंक करण्याची मुदत आधी 30 जून 2018 आणि त्यानंतर वाढवून ती 31 मार्च 2019 केली होती.
पॅनकार्ड, आधारकार्डशी लिंक करण्याच्या मुदतीत वाढ
Reviewed by साप्ताहिक एकच ध्येय
on
April 01, 2019
Rating:

No comments: