Seo Services
Seo Services

पोस्टल मतदानाचा टक्का वाढणार

Image result for पोस्टल मतदानाचा



पुणे :  लोकसभा निवडणुकीत टपाली मतदानप्रक्रियेत प्रथमच अवलंबण्यात येणाऱ्या नवीन ऑनलाइन पद्धतीमुळे मतदानाचा टक्का वाढणार आहे. इलेक्‍ट्रॉल ट्रान्समिट पोस्टल बॅलेट सिस्टिम (इटीपीबीएस) द्वारे सैन्यदलासह केंद्र व राज्य सरकारमधील सुरक्षा दलातील अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी ही सुविधा आहे. सर्व्हिस वोटरमध्ये डिफेन्स, सीमा सुरक्षा दल, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल, केंद्रीय राखीव पोलिस दल, भारतीय हवाई दल, भारतीय तटरक्षक दल, नौदल यांचा समावेश होतो.

पूर्वी पारंपरिक पद्धतीने या विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांना टपाल मतपत्रिका टपालाने पाठवल्या जात होत्या. मात्र, आता इटीपीबीएस या सुविधेमुळे सर्विस वोटर असलेल्या मतदारांना ऑनलाइन मतपत्रिका पाठविण्यात येणार आहेत.

त्यानंतर मतदान करून मतपत्रिका ते पोस्टाने पाठवू शकतात. त्यामुळे मतपत्रिका पाठविण्याचा एका बाजूचा वेळ वाचणार आहे.

पोस्टल मतदानासाठी तालुका पातळीवर पथक 

लोकसभा निवडणूक बंदोबस्तासाठी नेमण्यात आलेले पोलिस दलातील अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी टपाल मतदानाची इलेक्‍शन ड्युटी सर्टिफिकेट (ईडीसी) द्वारे मतदान करण्यासाठी फॉर्म न. १२ व फॉर्म १२ अ च्या मतपत्रिका पाठविण्यात येणार आहेत. लोकसभा निवडणुकीत पोस्टल बॅलेटचे कामकाज योग्य पद्धतीने व मुदतीत पार पाडण्यासाठी प्रत्येक विधानसभा मतदारसंघाच्या स्तरावर तहसीलदार अंतर्गत एक पोस्टल बॅलेट पथक स्थापन करण्यात आले आहे.

मतपत्रिका ऑनलाइन! 


परदेशात कार्यरत असलेले शासकीय अधिकारी, कर्मचारी, सैनिक यांना त्यांच्या-त्यांच्या खात्यामार्फत त्यांचे नाव असलेल्या लोकसभा मतदारसंघाच्या मतपत्रिका ऑनलाइन पद्धतीने पाठविल्या जातील. त्यांनी ऑनलाइन पद्धतीनेच भरायच्या आहेत. पुणे विभागात अशा प्रकारचे सुमारे पाच हजार मतदार असल्याची माहिती जिल्हा निवडणूक कार्यालयाने दिली.
पारंपरिक पद्धतीने पोस्टल मतदान करताना मतपत्रिका टपालाने पाठवून त्या टपालानेच मागवून घेतल्या जात असत. या प्रक्रियेसाठी जास्त कालावधी लागत होता. मात्र, नवीन तंत्रज्ञानामुळे ऑनलाइन इटीपीबीएस मतपत्रिका पोर्टलवर अपलोड करण्यात येणार आहेत. ऑनलाइन मतपत्रिका ही पोर्टलवर सात दिवस ठेवण्यात येणार आहे. या कालावधीत ती डाउनलोड करून प्रिंट काढून पोस्टाने पाठवायची आहे.
पोस्टल मतदानाचा टक्का वाढणार पोस्टल मतदानाचा टक्का वाढणार Reviewed by साप्ताहिक एकच ध्येय on April 01, 2019 Rating: 5

No comments:

ads 728x90 B
Powered by Blogger.