Seo Services
Seo Services

परवानगी शिवाय वाहनावर झेंडे लावू नये; आचार संहितेचा भंग झाल्यास कारवाई : डॉ.कुणाल खेमनार



चंद्रपूर : आगामी लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू असताना जिल्ह्यात फिरणाऱ्या खासगी वाहनावर परवानगीशिवाय कोणत्याही पक्षाचे अथवा उमेदवाराचे प्रचारसाहित्य लावल्यास आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी कारवाई केली जाईल. तसेच प्रसारसाहित्य वरील केलेला खर्च उमेदवाराच्या निवडणूक खर्च खात्यात समाविष्ट करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ.कुणाल खेमनार यांनी दिला आहे.

निवडणुकीत खासगी वाहनांद्वारे प्रचार करायचा असेल तर त्या वाहनाची कायदेशीर परवानगी घेणे आवश्यक असते. अन्यथा आचारसंहितेचे उल्लंघन ठरते. शिवाय परवानगीशिवाय खाजगी वाहनांद्वारे प्रचार करत असताना त्यावर लावलेले पक्षाचे किंवा उमेदवारांचे झेंडे, फलक, स्टिकर आणि पत्रके लावल्यास सदर कृती आयपीसी धारा १७१ (ह) नुसार कारवाईस पात्र ठरते.

तसेच वाहनांची बाह्य सजावट केल्यास आणि वाहनावर ध्वनी प्रक्षेपक लावल्यास ते मोटर वाहन कायदा १९८८ चे उल्लंघन ठरते. प्रचारसाहित्याच्या संदर्भात परवानगीसाठी निवडणुकीची घोषणा झाल्याच्या तीन दिवसाच्या आत लोकप्रतिनिधी कायदा १९५१ नुसार सर्व दस्तऐवजांचे चार प्रतीत जिल्हादंडाधिकाऱ्यांना सादरीकरण करावे लागते. प्रचारसाहित्याची यादी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सूचना फलकावर लावणे बंधनकारक आहे.
परवानगी शिवाय वाहनावर झेंडे लावू नये; आचार संहितेचा भंग झाल्यास कारवाई : डॉ.कुणाल खेमनार परवानगी शिवाय वाहनावर झेंडे लावू नये; आचार संहितेचा भंग झाल्यास कारवाई : डॉ.कुणाल खेमनार Reviewed by साप्ताहिक एकच ध्येय on April 06, 2019 Rating: 5

No comments:

ads 728x90 B
Powered by Blogger.