मुंबई : मुंबई उच्च न्यायालयाचे नवनियुक्त मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती प्रदीप नंदराजोग उद्या रविवारी दि. 7 एप्रिल रोजी सकाळी 10.30 वाजता पदाची शपथ घेणार आहेत.
राज्यपाल चे. विद्यासागर राव न्यायमुर्ती नंदराजोग यांना राजभवन येथील जलविहार सभागृहात पदाची शपथ देतील. न्यायमूर्ती प्रदीप नंदराजोग सध्या राजस्थान उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून कार्यरत आहेत.
मुंबई उच्च न्यायालयाचे विद्यमान मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती नरेश पाटील दिनांक 6 एप्रिल रोजी नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होत आहेत.
नवनियुक्त मुख्य न्यायाधीश प्रदीप नंदराजोग यांचा उद्या शपथविधी
Reviewed by साप्ताहिक एकच ध्येय
on
April 06, 2019
Rating:

No comments: