Seo Services
Seo Services

एव्हरेस्ट चढाईसाठी पुन्हा एकदा आदिवासी विद्यार्थी सज्ज


मुख्य सचिवांच्या प्रमुख उपस्थितीतमिशन शौर्य 2019’ शुभेच्छा सोहळा संपन्न

मुंबई आदिवासी विकास विभागाच्या वतीने सुरु करण्यात आलेल्या 'मिशन शौर्य मोहिमे'अंतर्गत राज्यातील शासकीय व अनुदानित आदिवासी आश्रम शाळेतील 11 विद्यार्थी सर्वोच्च एव्हरेस्ट शिखर सर करण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज झाले आहेत.

या विद्यार्थ्यांना शुभेच्छा देण्यासाठी मिशन शौर्य 2019 शुभेच्छा सोहळा'सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित करण्यात आला होता. यावेळी मुख्य सचिव यू.पी.एस.मदानआदिवासी विकास विभागाच्या प्रधान सचिव मनिषा वर्माप्रशिक्षक अविनाश देऊस्करबिमला देऊस्कर व संबंधित अधिकारी  उपस्थित होते.

श्री. मदान म्हणालेआदिवासी विद्यार्थ्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी एव्हरेस्ट सर करण्याची मिळालेली संधी निश्चितच महत्वाची आहे. या विद्यार्थ्यांच्या भविष्यातील वाटचालीसाठी हा अनुभव उपयोगी पडेल. ही मोहीम विद्यार्थ्यांमध्ये धाडस,धैर्य आणि जिद्द निर्माण करण्यासाठी उपयुक्त ठरेल. एव्हरेस्ट मोहिमेसाठी निघालेल्या आदिवासी विद्यार्थांना त्यांनी शुभेच्छा दिल्या.

मनिषा वर्मा म्हणाल्यामिशन शौर्य  ही मोहीम आदिवासी विद्यार्थ्यांना केवळ एव्हरेस्ट चढाईपुरती मर्यादित नाही तर कठीण परिस्थितीत आव्हानांना पेलत यश संपादित करण्यासाठी एक नवी उर्मी देणारी आहे.

मिशन शौर्य मोहिमेत गेल्या वर्षी पाच आदिवासी विद्यार्थ्यांनी एव्हरेस्ट सर करत साऱ्या जगाचे लक्ष वेधून घेतले होते. या  एव्हरेस्ट चढाईसाठी आवश्यक असलेल्या साहसाची ओळख विद्यार्थ्यांना करून देण्यासाठी वर्धा येथील ज्ञानभारती स्किल डेव्हलपमेंट सेंटरमध्ये मूलभूत प्रशिक्षण देण्यात आले होते. या केंद्रात 203 विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यात आले. यातून  132 विद्यार्थ्यांना  हैद्राबादमधील भोंगीर येथे रॅपलिंग आणि रॉक क्लायमिंगचे प्रशिक्षण देण्यात आले. या प्रशिक्षणात उत्कृष्ट ठरलेल्या 41 विद्यार्थ्यांची निवड दार्जिलिंग मधील हिमालयन माउंटनरींग इन्स्टिट्यूट येथील प्रशिक्षणासाठी करण्यात आली. येथे खाद्यपदार्थांचा व पाण्याचा साठा करण्याचे प्रशिक्षणश्वासोच्छ्वासाचे तंत्र विद्यार्थ्यांना शिकवण्यात आले. त्यापैकी 30 उत्कृष्ट विद्यार्थ्यांची अॅडव्हान्स माउंटनरींग कोर्ससाठी निवड करण्यात आली.  वीस दिवसांच्या प्रशिक्षणानंतर सिक्कीममध्ये हिमालयन सेंटर फॉर अॅडव्हेंचर या ठिकाणी विद्यार्थ्यांनी प्रशिक्षण पार पाडले. या प्रशिक्षणात उत्कृष्ट ठरलेल्या 18 विद्यार्थ्यांना लेह येथे बर्फाळ नदीतून चालणेउणे 35 अंश तापमानात स्वतःचा बचाव करणे याचे प्रशिक्षण देण्यात आले होते. या प्रशिक्षण प्रक्रियेत विद्यार्थ्यांची मानसिक स्थितीआहारपोषण मूल्ये अशी सर्वंकष तयारी करण्यात आली होती. या संपूर्ण प्रशिक्षणाअंती उत्तम कामगिरी बजावणाऱ्या 11 विद्यार्थ्यांची निवड मिशन शौर्य 2019 च्या एव्हरेस्ट मोहिमेसाठी करण्यात आली आहे. या वर्षी मोहिमेच्या दुसऱ्या पर्वात मेळघाट,पालघरधुळेपांढरकवडानाशिक येथील मुन्ना धिकारशिवचरण भिलावेकरसुग्रीव मंदेसुषमा मोरे,अंतुबाई कोटनाकेसुरज आडेमनोहर हिलीमचंद्रकला गावितहेमलता गायकवाडकेतन जाधवअनिल कुंदे या विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली असल्याची माहिती श्रीमती वर्मा यांनी दिली.
एव्हरेस्ट चढाईसाठी पुन्हा एकदा आदिवासी विद्यार्थी सज्ज एव्हरेस्ट चढाईसाठी पुन्हा एकदा आदिवासी विद्यार्थी सज्ज Reviewed by साप्ताहिक एकच ध्येय on April 06, 2019 Rating: 5

No comments:

ads 728x90 B
Powered by Blogger.