पिंपरी : दिवसेंदिवस पाण्याची टंचाई जाणवत असताना शहरात वॉशिंग सेंटरद्वारे मोठ्या प्रमाणात पाण्याचा अपव्यय होत असून महापलिका प्रशासनाने वॉशिंग सेंटर तातडीने बंद करावेत, अशी मागणी जागरुक नागरिक संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.
संघटनेच्या वतीने महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शहरात पाणीटंचाई असल्याने शहरवासियांना दिवसातून एकदाच पाणी मिळत असून एक दिवस पाणी बंद ठेवले असतांना काही व्यावासायिक पाण्याचा गैरवापर करत आहेत.
आकुर्डी येथील प्राधिकरण रस्त्यावर, गंगानगर नाल्याजवळ, नर्सरीच्या जागेवर नवीन वॉशिंग सेंटर सुरु करण्यात आले आहे. यावर कुठलीही कारवाई होत नसल्याने पाण्याचा अपव्यय होत आहे.
पाण्याची टंचाई जाणवत असताना शहरातील वॉशिंग सेंटर तातडीने बंद करावेत
Reviewed by साप्ताहिक एकच ध्येय
on
April 02, 2019
Rating:
No comments: