पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रातील दिव्यांग नागरिकांची पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपीएमएल) मोफत पाससाठी फरफट केली जात आहे. मुदत संपलेल्या 'मी कार्ड' चे नूतनीकरण करण्यासाठी दिव्यांग नागरिकांना पिंपरीतील लोखंडे भवन येथे सोमवारी कडक उन्हात रांगेत उभे राहावे लागले. त्यामुळे दिव्यांग नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिका नागरवस्ती विकास योजना विभागातर्फे अपंग कल्याणकारी योजनेंतर्गत महापालिका हद्दीतील अंध, अपंग, मूकबधीर आदी दिव्यांग व्यक्तींना पीएमपीएलचे मोफत बसपास देण्यात येतात. सन 2018- 19 या आर्थिक वर्षांमध्ये शहरातील सुमारे अडीच हजार दिव्यांग नागरिकांना 'मी कार्ड' देण्यात आले होते. आर्थिक वर्षाबरोबर म्हणजेच 31 मार्च रोजी या 'मी कार्ड'ची मुदत संपली आहे. त्यामुळे दिव्यांग नागरिक कार्ड नूतनीकरण करण्यासाठी जात असताना तिकीट काढण्यावरुन त्यांच्यामध्ये आणि पीएमपीएल बसच्या वाहकांमध्ये वाद झाल्याचे दिसून आले.
'मी कार्ड'चे नूतनीकरण करण्यासाठी दिव्यांग नागरिकांना सोमवारी पिंपरीतील लोखंडे भवन येथे बोलविण्यात आले आहे. लोखंडे भवन येथे 'मी कार्ड'चे नूतनीकरण करण्यासाठी दिव्यांग नागरिकांची गर्दी झाली आहे. त्यांना कडक उन्हात रांगेत ताटकळत उभे राहावे लागले. कोणतेही नियोजन केले नाही. दिव्यांग नागरिकांना जिना चढताना अडचणी येत आहेत. कार्डचे नूतनीकरणासाठी आलेल्या दिव्यांग नागरिकांची फरफट होत आहे.
दिव्यांग नागरिकांची पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपीएमएल) मोफत पाससाठी फरफट
Reviewed by साप्ताहिक एकच ध्येय
on
April 02, 2019
Rating:
No comments: