Seo Services
Seo Services

महाराष्ट्र दिन शासकीय सोहळ्याची शिवाजी पार्क येथे रंगीत तालीम


मुंबई महाराष्ट्र दिनी साजऱ्या होणाऱ्या मुख्य शासकीय सोहळ्याची आज शिवाजी पार्क येथे रंगीत तालीम करण्यात आली. यावेळी लोहमार्ग पोलीस दलवाहतूक पोलीस दल,महापालिका सुरक्षा दलब्रास बँड पथकसशस्त्र पोलीस दलदंगल नियंत्रण पथकमहिला पोलीस दल आदी दलांनी संचलनाची रंगीत तालीम केली. यावेळी अग्निशमन दलाच्या वाहनांच्या सादरीकरणाची रंगीत तालीम करण्यात आली.



२६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनी झालेल्या मुख्य शासकीय सोहळ्यात सर्वोत्कृष्ट संचलन केलेल्या पथकांना यावेळी अपर पोलीस महासंचालक (प्रशासन) डॉ. प्रज्ञा सरवदे यांच्या हस्ते गौरविण्यात आले. यात राज्य राखीव पोलीस बलमुंबई अग्निशमन दल व बृहन्मुंबई पोलीस सशस्त्र दल (महिला) या शासकीय सेवेतील पथकांनी अनुक्रमे प्रथमद्वितीय व तृतीय क्रमांक पटकावला. शालेय पथकांमध्ये भारत स्काउट आणि गाईडस् (मुली) यांनी प्रथम तर आरएसपी (मुली)रुस्तमजी इंटरनॅशनल हायस्कूलदहिसर यांनी दुसरा क्रमांक पटकावला.


महाराष्ट्र दिन शासकीय सोहळ्याची शिवाजी पार्क येथे रंगीत तालीम महाराष्ट्र दिन शासकीय सोहळ्याची शिवाजी पार्क येथे रंगीत तालीम Reviewed by साप्ताहिक एकच ध्येय on April 27, 2019 Rating: 5

No comments:

ads 728x90 B
Powered by Blogger.