Seo Services
Seo Services

मतदानासाठी मतदार चिठ्ठीसोबत ओळखपत्र आवश्यक

मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी सोमवार दि. 29 एप्रिल 2019 रोजी शेवटच्या टप्प्याचे मतदान होणार आहे. मतदाराला निर्भय आणि मुक्त वातावरणात मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी निवडणूक यंत्रणेने जय्यत तयारी केली आहे. निवडणूक आयोगाचे ओळखपत्र (Epic) अथवा 11 प्रकारच्या ओळखपत्रांपैकी एक ओळखपत्र दाखवून मतदान करता येईल. मतदारांच्या सोयीसाठी देण्यात आलेली मतदार चिठ्ठी ही मतदाराचे नावमतदान केंद्र याच्या माहितीसाठी आहे. केवळ ही मतदार चिठ्ठी मतदानासाठी पुरेशी नाही. मतदार यादीत नाव असणे आवश्यक आहे. निवडणूक आयोगाचे ओळखपत्र अथवा 11 प्रकारच्या ओळखपत्रांपैकी एक ओळखपत्र आवश्यक असल्याचे अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे यांनी सांगितले.

ऑनलाईन मतदार पावतीमुळे मतदान केंद्रमतदार यादीतील क्रमांक आणि यादी भाग क्रमांक आदीबाबत माहिती मिळणे शक्य होणार आहे. nvsp.in या निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर किंवा ceo.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर मतदान केंद्रक्रमांक,स्थळ इत्यादी तपशील पाहता येईल. प्रत्यक्ष मतदानाच्या वेळी निवडणूक आयोगाचे ओळखपत्र किंवा अन्य अकरा प्रकारच्या ओळखपत्रांपैकी कोणतेही एक ओळखपत्र आवश्यक आहेअसेही श्री. शिंदे यांनी सांगितले.

मतदानासाठी आवश्यक 11ओळखपत्रे

मतदानासाठी भारत निवडणूक आयोगाचे ओळखपत्र नसेल आणि मतदार यादीत नाव असेल तर अशावेळी अन्य अकरा प्रकारे आयोगाने ग्राह्य केलेल्या ओळखपत्रांच्या माध्यमातून मतदारास आपला हक्क बजावता येईल. यामध्ये पासपोर्ट (पारपत्र)वाहन चालक परवानाछायाचित्र असलेले कर्मचारी ओळखपत्र (राज्य/केंद्र शासन,सार्वजनिक उपक्रमसार्वजनिक मर्यादित कंपन्यांचे ओळखपत्र),छायाचित्र असलेले बँकांचे पासबूक,पॅनकार्डराष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी (नॅशनल पॉप्युलेशन रजिस्टर) अंतर्गत महसूल निर्मिती निर्देशांक (रेव्हेन्यू जनरेशन इंडेक्स) द्वारे दिलेले स्मार्टकार्ड,मनरेगा जॉबकार्डकामगार मंत्रालयाने दिलेले आरोग्य विमा स्मार्टकार्ड,छायाचित्र असलेले निवृत्तीवेतन दस्तावेजखासदार/आमदार/विधानपरिषद सदस्य यांनी दिलेले ओळखपत्र आणि आधारकार्ड यांचा समावेश आहे.
मतदानासाठी मतदार चिठ्ठीसोबत ओळखपत्र आवश्यक मतदानासाठी मतदार चिठ्ठीसोबत ओळखपत्र आवश्यक Reviewed by साप्ताहिक एकच ध्येय on April 27, 2019 Rating: 5

No comments:

ads 728x90 B
Powered by Blogger.