नागपूर : लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात देशातील १८ राज्ये आणि दोन केंद्रशासित प्रदेशांतील ९१ मतदारसंघांतील प्रचाराची मंगळवारी सांगता झाली. राज्यातील विदर्भातील सात जागांसह या ९१ जागांसाठी गुरुवारी ११ एप्रिलला मतदान होणार आहे.
निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात राज्यातील सात लोकसभा मतदारसंघांत मतदान होत आहे. त्यामध्ये वर्धा, रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर आणि यवतमाळ-वाशिम मतदारसंघांचा समावेश आहे. त्यात प्रामुख्याने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, हंसराज अहिर, विधान परिषदेचे माजी उपसभापती माणिकराव ठाकरे यांच्यासह नाना पटोले, भावना गवळी आदी उमेदवारांचे राजकीय भवितव्य ठरणार आहे.
या टप्प्यात देशातील लोकसभेच्या ९१ जागांबरोबरच आंध्र प्रदेश, सिक्कीम आणि ओदिशा या राज्यांत विधानसभा निवडणुकांसाठी मतदान होणार आहे. तेलंगणमधील लोकसभेच्या सर्व १७ जागांसाठी पहिल्या टप्प्यात मतदान होणार आहे.
उत्तराखंडमधील पाच, बिहारमधील चार, पश्चिम बंगाल, जम्मू-काश्मीर, मेघालय, अरूणाचल प्रदेशमधील प्रत्येकी दोन आणि मिझोराम, त्रिपुरा, मणिपूर, नागालॅन्ड, सिक्कीम, अंदमान-निकोबार येथील प्रत्येकी एका जागेसाठी गुरुवारी मतदान होणार आहे.
विदर्भातील सात जागांसाठी उद्या मतदान
Reviewed by साप्ताहिक एकच ध्येय
on
April 10, 2019
Rating:

No comments: