Seo Services
Seo Services

देशभरातल्या विद्यापीठांच्या यादीत पुणे विद्यापीठ ९ व्या स्थानी


नवी दिल्ली : मानव संसाधन विकास मंत्रालयाने (HRD) उच्च शैक्षणिक संस्थांची क्रमवारी (NIRF 2019 Rankings) घोषित केली आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी सर्वोत्कृष्ट शैक्षणिक संस्था, सर्वोतृष्ट विद्यापीठं आणि सर्वोत्कृष्ट अभियांत्रिकी महाविद्यालयांच्या नावांची यादी जाहीर केली आहे. 

सर्वोत्कृष्ट विद्यापीठांच्या यादीत पुण्याच्या सावित्रीबाई फुले विद्यापीठाला नववे स्थान प्राप्त झाले आहे तर मुंबई विद्यापीठ 81 व्या स्थानी आहे. विद्यापीठांच्या यादीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, बंगळुरुने पहिला क्रमांक पटकावला आहे तर टॉप 10 विद्यापीठांच्या यादीत महाराष्ट्रातील केवळ पुणे विद्यापीठाला स्थान मिळवता आले आहे.

अभियांत्रिकी महाविद्यालयांच्या यादीत आयआयटी मद्रासने पहिला क्रमांक पटकावला आहेत. तर या या यादीत आयआयटी बॉम्बे या महाराष्ट्रातल्या एकमेव अभियांत्रिकी संस्थेला स्थान मिळवता आले आहे. आयआयटी बॉम्बेला तिसरा क्रमांक मिळाला आहे. ही क्रमवारी ठरवण्यासाठी नॅशनल इन्स्टिट्यूशनल रॅन्किंग फ्रेमवर्कने (NIRF)संपूर्ण भारतातील सर्व विद्यापीठ, महाविद्यालय, मॅनेजमेंट, फार्मसी, मेडिकल, आर्किटेक्चर आणि विधी महाविद्यालयांचा अभ्यास केला होता.
देशभरातल्या विद्यापीठांच्या यादीत पुणे विद्यापीठ ९ व्या स्थानी देशभरातल्या विद्यापीठांच्या यादीत पुणे विद्यापीठ ९ व्या स्थानी Reviewed by साप्ताहिक एकच ध्येय on April 10, 2019 Rating: 5

No comments:

ads 728x90 B
Powered by Blogger.