नवी दिल्ली : सत्तेत असलेल्या भाजप आणि सत्तेत येण्यासाठी धडपड करत असलेल्या काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षांकडून मतदारांना आकर्षित करण्यासाठी मोठमोठी आश्वासनं दिली जात आहेत. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी 'न्याय' योजनेनंतर आणखी एक मोठं आश्वासन मतदारांनी दिलं आहे. काँग्रेस सत्तेत आल्यास रिक्त असलेली 22 लाख सरकारी पदे भरण्यात येतील असं आश्वासन राहुल गांधींनी दिलं आहे.
सध्या भारतात तरुण मतदारांची संख्या सर्वाधिक आहे. या तरुण वर्गाला आकर्षित करण्यासाठी सर्वच पक्ष प्रयत्न करत आहे. बेरोजगारी ही देशातील आजची सर्वात मोठी समस्या आहे, या समस्येवर तोडगा काढण्यासाठी काँग्रेस प्रयत्नशील असल्याचं राहुल गांधींनी दाखवलं आहे.
राहुल गांधींनी ट्विटरद्वारे ही माहिती दिली. राहुल गांधींनी ट्वीटमध्ये म्हटलं की, "आज 22 लाख सरकारी जागा रिक्त आहेत. या जागा 31 मार्च 2020 पर्यंत भरण्यात येतील. आरोग्य, शिक्षण इत्यादी केंद्र सरकारच्या विविध राज्यातील जागा भरण्यात येतील."
सत्तेत आल्यास २२ लाख सरकारी रिक्त जागा भरणार, राहुल गांधींची घोषणा :
Reviewed by साप्ताहिक एकच ध्येय
on
April 02, 2019
Rating:
No comments: