पुणे : पुणे जिल्ह्य़ातील पुणे, बारामती, मावळ आणि शिरूर अशा चारही लोकसभा मतदारसंघांमधील मतदारांची संख्या ७५ लाख १६ हजार ८८० झाली आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीसाठी राज्यात सर्वाधिक मतदान केंद्रे पुण्यात आहेत.
शहरासह जिल्ह्य़ातील एकूण मतदान केंद्रांची संख्या सात हजार ६६६ एवढी झाली आहे. दरम्यान, येत्या दोन दिवसांत पुरवणी यादी जाहीर होणार आहे. पुरवणी यादीत नाव असलेल्या मतदारांना लोकसभा निवडणुकीकरिता मतदान करता येणार आहे.
१ सप्टेंबर २०१८ रोजी प्रारूप मतदारयादी जाहीर झाल्यानंतर निवडणूक शाखेकडून सातत्याने खास मतदार नोंदणी मोहिमा हाती घेण्यात आल्या होत्या. तसेच शहरासह जिल्ह्य़ातील सर्व महाविद्यालयांमध्ये नवमतदारांची नोंदणी करण्यासाठी खास मोहिमांचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये नव्या मतदारांची नोंदणी करणे, मतदारांचे नाव, पत्ता यांची दुरुस्ती करणे, दुबार नावे वगळणे आदी कामे करण्यात आली. त्यामुळे आतापर्यंत तब्बल एक लाख ४७ हजार ७३९ अर्ज निवडणूक शाखेकडे दाखल झाले आहेत. या सर्व मतदारांची नावे पुरवणी मतदार यादीत समाविष्ट करण्याचे काम सुरू आहे.
राज्यात पुण्यात सर्वाधिक मतदान केंद्रे असून त्यानंतर मुंबई उपनगरमध्ये सात हजार २९७ मतदान केंद्रे आहेत. त्याखालोखाल ठाण्यात सहा हजार ४८८ मतदान केंद्रे आहेत.
लोकसभा निवडणुकीसाठी राज्यात सर्वाधिक मतदान केंद्रे पुण्यात
Reviewed by साप्ताहिक एकच ध्येय
on
April 02, 2019
Rating:
No comments: