Seo Services
Seo Services

बीएसपी (मायावती) सर्वात श्रीमंत पक्ष, ६६९ कोटींचा बँक बॅलेन्स

Image result for बहुजन समाज पक्षाने

दिल्ली : बँक बॅलेन्सच्या बाबतीत मायावती यांच्या बहुजन समाज पक्षाने (बीएसपी) इतर सर्व राष्ट्रीय आणि प्रादेशिक पक्षांना मागे टाकलं आहे. बीएसपीने निवडणूक आयोगाकडे २५ फेब्रुवारी रोजी आपल्या एकूण खर्चाची माहिती दिली असून यानुसार राजधानी दिल्लीतील सरकारी बँकांच्या शाखेमधील आठ वेगवेगळ्या खात्यांमध्ये एकूण ६६९ कोटी रुपये डिपॉजिट आहेत.

२०१४ लोकसभा निवडणुकीत आपलं खातंही खोलू न शकलेल्या बीएसपीने आपल्या हातात सध्या ९५.९४ लाख इतकी रोख रक्कम असल्याची माहिती दिली आहे. दरम्यान दुसऱ्या स्थानावर समाजवादी पक्ष असून पक्षाच्या वेगवेगळ्या खात्यांमध्ये एकूण ४७१ कोटी रुपये आहेत. मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान आणि तेलंगणामधील विधानसभा निवडणुकीनंतर पक्षाचा कॅश डिपॉझिट ११ कोटींनी कमी झाला.

काँग्रेस या यादीत तिसऱ्या स्थानावर आहे. काँग्रेसकडे १९६ कोटींचा बँक बॅलेन्स आहे. मात्र ही माहिती गतवर्षी २ नोव्हेंबर रोजी निवडणूक आयोगाला देण्यात आलेल्या माहितीच्या आधार देण्यात आली आहे, काँग्रेसने मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड विधानसभा निवडणुकीत झालेल्या विजयानंतर आपल्या बँक बॅलेन्सची माहिती अपडेट केलेली नाही.

भाजपा मात्र या यादीत प्रादेशिक पक्षांच्याही मागे पडली आहे. भाजपा टीडीपीनंतर पाचव्या स्थानावर आहे. भाजपाकडे ८२ कोटींचा बँक बॅलेन्स आहे तर टीडीपीजवळ १०७ कोटींचा आहे. भाजपाचा दावा आहे की, २०१७-१८ मध्ये मिळालेल्या १०२७ कोटींपैकी ७५८ कोटी खर्च करण्यात आले. कोणत्याही पक्षाकडून खर्च करण्यात आलेली ही सर्वात जास्त रक्कम आहे.
बीएसपी (मायावती) सर्वात श्रीमंत पक्ष, ६६९ कोटींचा बँक बॅलेन्स बीएसपी (मायावती) सर्वात श्रीमंत पक्ष, ६६९ कोटींचा बँक बॅलेन्स Reviewed by साप्ताहिक एकच ध्येय on April 15, 2019 Rating: 5

No comments:

ads 728x90 B
Powered by Blogger.