प्रमुख विरोधी पक्ष काँग्रेसच्या आरोपांनंतर निवडणूक आयोगाने सर्व राजकीय पक्षांना देण्यात आलेल्या एअर टाइमवर डीडी न्यूजकडून अहवाल मागवला आहे. काँग्रेसने आपल्या तक्रारीत म्हटले होते की, डीडी न्यूज सत्ताधारी भाजपाला जास्त कव्हरेज देत आहे.
यापूर्वी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस सीताराम येचुरी यांनी पोल पॅनलकडे अशीच सूचना केली होती. येचुरींनी म्हटले होते की, पोल पॅनलने दूरदर्शन आणि ऑल इंडिया रेडिओला (एआयआर) राजकीय नोत्यांच्या भाषणांना आणि विधानांना प्रामुख्याने प्रसारित करण्यासाठी सांगण्यात यावे. कारण, त्यांनी अॅन्टी सॅटेलाइट क्षेपणास्राच्या यशस्वी परीक्षणानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा राष्ट्राला उद्देशून संदेश प्राधान्याने प्रसारित केला होता.
मोदींचा कार्यक्रम लाईव्ह दाखवल्याने डीडी न्यूजला निवडणूक आयोगाची नोटीस :
Reviewed by साप्ताहिक एकच ध्येय
on
April 06, 2019
Rating:

No comments: