Seo Services
Seo Services

यूपीएससी परीक्षेत देशात महिलांमध्ये अव्वल सृष्टी देशमुख


भोपाळ : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा अर्थात यूपीएससी 2018 परीक्षेत मराठमोळ्या सृष्टी देशमुखने महिलांमध्ये अव्वल येण्याचा मान पटकावला आहे. भोपाळमध्ये राहणाऱ्या सृष्टीने देशात पाचवा क्रमांक पटकावला. लहानपणापासून पाहिलेलं स्वप्न तिने पहिल्याच प्रयत्नात पूर्ण केलं.


सिक्युअर करिअर म्हणून सृष्टीने सुरुवातीला इंजिनिअरिंग केलं. मात्र नागरी सेवा तिला खुणावत होत्या. लहानपणापासून कलेक्टर होण्याचं स्वप्न पाहिलेल्या सृष्टी देशमुखने त्यादृष्टीने प्रयत्न सुरु केले. विशेष म्हणजेच पहिल्याच प्रयत्नात तिने यशाला गवसणी घातली आहे. टॉप दहामध्ये येण्याचं ठरवलं होतं, असंही सृष्टी म्हणते.



रोज अभ्यास सुरु असतानाच ऑनलाईन टेस्ट सीरिजच्या माध्यमातून ती स्वतःला तपासून पाहत होती. भोपाळसोबतच दिल्लीमधल्या चांगल्या शिक्षकांचं मार्गदर्शन लाभल्याचंही सृष्टी सांगते.



यूपीएससीसारख्या स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करताना सृष्टीला दोन वैशिष्ट्यं जाणवली. एक तर तुम्ही यशस्वी होऊन नागरी सेवेची वाट चोखंदळता. पण दुसरं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वतःला प्रेरणा देणं. लवकर उठायचं आणि अभ्यासाला बसायचं, कधी तुम्ही एकटेच अभ्यास करत असता, बराचसा वेळ घरातच जातो. लग्न सोहळ्यांना हजेरी लावता येत नाही, सोशल मीडियापासून दूर, मात्र हे मोटिवेशन तुम्हाला यशाच्या दिशेने नेतं, असं तिला वाटतं.
यूपीएससी परीक्षेत देशात महिलांमध्ये अव्वल सृष्टी देशमुख यूपीएससी परीक्षेत देशात महिलांमध्ये अव्वल सृष्टी देशमुख Reviewed by साप्ताहिक एकच ध्येय on April 06, 2019 Rating: 5

No comments:

ads 728x90 B
Powered by Blogger.