नवी दिल्ली : जागतिक आरोग्य दिनाच्या कार्यक्रमाचा एक भाग म्हणून सार्वत्रिक आरोग्य सेवे प्रति, कटिबद्धता दर्शवत आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने आज जागतिक आरोग्य संघटनेसह एका भक्कम मानवी साखळीचे आयोजन केले होते. यंदाच्या जागतिक आरोग्य दिनाची संकल्पना ‘प्रत्येकासाठी आणि सर्वत्र आरोग्य सेवा’. समाजातील सर्व घटकांना दर्जेदार आरोग्य सेवा कुठल्याही आर्थिक मोबदल्याशिवाय मिळतील, हे सुनिश्चित करण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याचे आरोग्य सचिव प्रीती सुदान यांनी सांगितले. त्यांनी प्रत्येकाला आरोग्य सेवा उपलब्ध करुन देण्यासाठी काम करण्यासाठी उपस्थितांना प्रतिज्ञा देखिल दिली.
यावेळी आरोग्य मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी आणि जागतिक आरोग्य संघटनेचे प्रतिनिधी उपस्थित होते. देशभरात आतापर्यंत 17 हजारांहून अधिक आरोग्य आणि कल्याण केंद्रे कार्यरत असल्याचे सुदान यांनी सांगितले.
सार्वत्रिक आरोग्य सेवे प्रति, कटिबद्धता दर्शवत आरोग्य मंत्रालयाने भक्कम मानवी साखळी तयार केली
Reviewed by साप्ताहिक एकच ध्येय
on
April 04, 2019
Rating:

No comments: