Seo Services
Seo Services

४५ व्या पेन्शन अदालतीचे आयोजन मुंबईमध्ये २५ जुलै रोजी



मुंबई : मुख्य पोस्टमास्तर जनरल, महाराष्ट्र सर्कल, मुंबई यांच्याद्वारे 25-07-2019 रोजी 11.00 वाजल्यापासून  मुख्य पोस्टमास्तर जनरलचे कार्यालय, मुंबई – 400 001 मध्ये टपाल विभागाच्या निवृत्तिवेतनधारकांसाठी / कुटुंब निवृत्तवेतनधारकांसाठी 45 वी पेंशन अदालत आयोजित केली आहे.    
महाराष्ट्र आणि गोवा राज्यातील टपाल विभागाच्या निवृत्तिवेतनाच्या लाभाशी संबंधित अशा तक्रारी, ज्यांचा  3 महिन्यांच्या आत निपटारा झालेला नाही अशा प्रकरणांचा डाक पेंशन अदालत मध्ये विचार केला जाईल. पेंशन अदालतमध्ये कायदेशीर बाबी अर्थात उत्तराधिकार इत्यादि आणि निती प्रकरणांशी संबंधित तक्रारींचा विचार करण्यात येणार नाही.
निवृत्तिवेतनधारक खाली दिलेल्या प्रपत्रामध्ये आपले अर्ज श्री जी. जी. पराते , लेखा अधिकारी / सचिव, पेंशन अदालत, मुख्य पोस्टमास्तर जनरलचे कार्यालय, महाराष्ट्र सर्कल, मुंबई जीपीओ भवन, दूसरा मजला, मुंबई – 400 001 ला 14.06.2019 रोजी किंवा यापूर्वी पाठवू शकतात. 14.06.2019 च्या नंतर मिळालेल्या अर्जांवर पेंशन अदालतमध्ये विचार करण्यात येणार नाही. 
४५ व्या पेन्शन अदालतीचे आयोजन मुंबईमध्ये २५ जुलै रोजी ४५ व्या पेन्शन अदालतीचे आयोजन मुंबईमध्ये २५ जुलै रोजी Reviewed by साप्ताहिक एकच ध्येय on April 04, 2019 Rating: 5

No comments:

ads 728x90 B
Powered by Blogger.