निवडणूक निरीक्षकांनी केली अंतिम तपासणी
खर्च निरीक्षक विक्रम पगारिया यांनी उमेदवारांच्या खर्चाच्या नोंदवहिची अंतिम तपासणी केल्यानंतर नोटीस देण्याचे आदेश दिले. यात भावना गवळी, माणिकराव ठाकरे, शहेजाद समिउल्ला खान, वैशाली येडे, अनिल राठोड, अरुण किनवटकर, पुंडलीक राठोड, परशराम आडे, प्रवीण पवार, सलीम शाह सुलेमान शाह, रवी जाधव, डॉ. राजीव अग्रवाल, अंकित चांडक, प्रेमासाई महाराज, शेख जावेद शेख मुश्ताक आणि सिंपल राठोड यांचा समावेश आहे.
कमी खर्च दाखविल्याबद्दल मागील निरीक्षणाच्या वेळी ज्या उमेदवारांना नोटीस बजावण्यात आल्या होत्या. त्यापैकी बहुतांश उमेदवारांनी खर्च मान्य करून सदर खर्च नोंदवहित समाविष्ट केला आहे. रवी जाधव यांना तीन वेळा नोटीस देऊनही त्यांनी खर्चाची देयके सादर केली नाही. तसेच माणिकराव ठाकरे यांनी सात ते आठ लक्ष रुपये खर्च कमी दाखविला असून सोशल मीडिया व ॲप विकसीत करण्यावर केलेला खर्च दाखवला नाही. भावना गवळी यांनी मुख्यमंत्र्यांची वाशिम येथे झालेल्या सभेचा खर्च दाखविला नाही. तसेच त्यांनीसुध्दा स्वत:च्या नावाचे ॲप विकसीत केले आहे, पण त्याचा खर्च दाखविला नाही, असे अंतिम तपासणीस निदर्शनास आले आहे.
निवडणूक आयोगाच्या सुचनेनुसार दहा हजार रुपयांवरील कोणताही खर्च हा रेखांकित धनादेशाद्वारे करणे बंधनकारक आहे. परंतु पी.बी.आडे यांनी तीन ते चार लक्ष रुपये खर्च रोखीने केला आहे. देणगी स्वीकारतानासुध्दा उमेदवार दहा हजार रुपयांच्यावर रोखीने स्वीकारू शकत नाही. परंतु प्रवीण पवार यांनी विविध लोकांकडून २५ लक्ष रुपयांपर्यंत देणगी रोख स्वरुपात स्वीकारल्याचे निदर्शनास आले आहे. प्रेमासाई महाराज यांनी खर्च दाखवितांना बहुतांश खर्च हा त्यांच्या भक्तांनी केल्याचे दाखविले असून भक्तांची नावे उघड केली नसल्याचे तपासणीदरम्यान आढळून आले आहे.
खर्च नोंदीबाबत टाळाटाळ करणाऱ्या उमेदवारांना नोटीस
Reviewed by साप्ताहिक एकच ध्येय
on
April 11, 2019
Rating:

No comments: