मुंबई : दूरचित्रवाणी वाहिन्यांवरील मालिकांमधून विविध योजनांचा प्रचार केल्याच्या तक्रारीची दखल राज्य निवडणूक आयोगाने घेतली आहे, असा प्रचार करणाऱ्या झी टीव्ही व अँड टीव्हीवरील मालिकांच्या निर्मात्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली असल्याची माहिती अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे यांनी दिली.
झी टीव्ही व अँड टीव्हीवरील मालिकामधून केंद्र शासनाच्या योजनांचा प्रचार करून आचारसंहिता भंग केल्याच्या तक्रारी आल्या होत्या. या तक्रारींची दखल मुख्य निवडणूक कार्यालयाने घेतली आहे. असा प्रचार करणाऱ्या या दोन्ही वाहिन्यांवरील संबंधित मालिकांच्या निर्मात्यांना चोवीस तासात त्यांचे म्हणणे मांडण्यास या नोटिसीद्वारे सांगितले आहे. त्यांचे उत्तर आल्यानंतर पुढील योग्य ती कार्यवाही आयोगाकडून करण्यात येईल, असे श्री.शिंदे यांनी सांगितले.
टीव्ही मालिकांमधून प्रचार करणाऱ्या निर्मात्यांना निवडणूक आयोगाची नोटीस
Reviewed by साप्ताहिक एकच ध्येय
on
April 09, 2019
Rating:
Reviewed by साप्ताहिक एकच ध्येय
on
April 09, 2019
Rating:

No comments: