Seo Services
Seo Services

क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले व महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त शहरात दुचाकी रॅलीचे आयोजन

Image result for महात्मा ज्योतिबा फुले


पिंपरी : 11 एप्रिल 2019 रोजी क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले जयंती व 14 एप्रिल 2019 महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती निमित्त आपल्या पिंपरी-चिंचवड शहरातील विविध समविचारी संघटनांच्या माध्यमातून, विविध कार्यक्रम होत असतात. त्याचाच एक भाग म्हणून 11 एप्रिल सकाळी 9 ते दुपारी 12  या वेळेत पिपरी चिंचवड शहरात  दुचाकी रॅलीचे आयोजन करण्यात आलेले आहे.
        
ते पुढील प्रमाणे 11 एप्रिल 2019 रोजी सकाळी 9 वाजता भक्ती शक्ती शिल्प-निगडी येथून सुरुवात..... पुढे भेळचौक..... संभाजी चौक निगडी प्राधिकरण..... म्हाळसाकांत हायस्कुल चौक,आकुर्डी गावठाण...... खंडोबामाळ चौक,आकुर्डी..... दळवीनगर चिंचवड..... चाफेकर चौक...... गांधी पेठ चिंचवड गांव..... भिमनगर  चौक..... इंदिरा गांधी उड्डाणपूल पिंपरी...... अहिल्यादेवी पुतळाचौक, मोरवाडी...... डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक पिंपरी...... महात्मा फुले पुतळा पिंपरी येथे समारोप.......
       
याप्रमाणे दुचाकी रॅलीचे आयोजन विविध समविचारी संघटना, मंडळ यांचे सहकार्याने संयुक्तरित्या आयोजन केलेले आहे. संपूर्ण रॅली शांततेच्या मार्गाने होणार आहे. तरी योग्य ते सहकार्य व आपल्या संघटनेतील सर्व कार्यकर्त्यांचा सहभाग असावा.
क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले व महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त शहरात दुचाकी रॅलीचे आयोजन  क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले व महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त शहरात दुचाकी रॅलीचे आयोजन Reviewed by साप्ताहिक एकच ध्येय on April 09, 2019 Rating: 5

No comments:

ads 728x90 B
Powered by Blogger.