भोसरी : येत्या २९ एप्रिल
रोजी शिरूर लोकसभा मतदारसंघात मतदान होत आहे. या पार्श्वभूमीवर निवडणूक प्रशासनाने
मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी कंबर कसली आहे. याचाच एक भाग म्हणून अंध-अपंग आणि
दिव्यांग मतदारांना मतदान प्रक्रिया सुलभ रीतीने सांगण्यासाठी आणि मतदान कसे
करावे, याबाबत मार्गदर्शन करण्यासाठी मतदान जागृतीची विशेष कार्यशाळा घेण्यात आली.
प्रहार अपंग क्रांती संघटना आणि घरकुल अपंग सहाय्य संस्था यांनी याकामी विशेष
सहकार्य केले. या संस्थाच्या सहकार्याने सुमारे ७५ दिव्यांग मतदारासाठी या विशेष
कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेत EVM मशीन आणि VVPAT या बाबतची
प्रात्यक्षिकासह माहिती देण्यात आली. या वेळी अंध अपंग मतदारांनी प्रत्यक्ष मतदान
प्रक्रियेचा अनुभव घेतला. अंध मतदारासाठी ब्रेल लिपीतील मतपत्रिका तयार करण्यात
आली असून मतदान युनिट वर ब्रेल लिपीतील अंक छापण्यात आले आहेत. यावेळी अति.
सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी अप्पासाहेब समिंदर, नायब तहसीलदार अर्चना निकम,
EVM मशीन तज्ञ सुहास बहाद्दरपुरे तसेच प्रहार अपंग क्रांती संघटनेचे अध्यक्ष दत्ता
भोसले आणि घरकुल अपंग सहाय्य संस्थेच्या
अध्यक्ष संगीता जोशी हे उपस्थित होते.याप्रसंगी SVEEP समन्वय अधिकारी ज्योत्स्ना
शिंदे यांनी उपस्थितांचे स्वागत करून मार्गदर्शन केले. भोसरी विधानसभा
मतदारसंघाच्या सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी रेश्मा माळी यांच्या
मार्गदर्शनाखाली सदर कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यशाळेमुळे आम्हाला मतदान करणे
सुलभ होईल अशी भावना दिव्यांग मतदारांनी व्यक्त केली.यावेळी जिल्हा परिषदेचे अपंग
कक्ष अधिकारी भाऊसाहेब कांबळे यांनी मतदारांना मतदान करण्याची शपथ दिली आणि
सूत्रसंचालन केले. कार्यक्रमाच्या
यशस्वितेसाठी मतदान जनजागृती कक्षाचे सहाय्यक अधिकारी प्रदीप शिंदे, बाळासाहेब
जाधव, डॉ. अविनाश वाळुंज, क्षितीज शिंदे व मनोज मराठे यांनी प्रयत्न केले.
मतदान जागृतीची विशेष मोहीम दिव्यांग मतदारांसाठी
Reviewed by साप्ताहिक एकच ध्येय
on
April 15, 2019
Rating:
No comments: