भोसरी : येत्या २९ एप्रिल रोजी शिरूर लोकसभा
मतदारसंघात मतदान होणार आहे. या निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी विविध
स्तरावरून प्रयत्न केला जात आहे. विविध उपक्रम आणि कार्यक्रमांतून मतदारांना मतदान
केंद्रावर आणण्याचा प्रयत्नही जाणीवपूर्वक करण्यात येत आहे. यासाठी विशेष चित्ररथ
आणि कलापथकाद्वारे मतदान जागृती केली जात आहे. याकरिता निवडणूक कक्षाद्वारे भोसरी,
पिंपरी, चिंचवड या विधानसभा मतदारसंघासाठी तीन
खास चित्ररथांची निर्मिती करण्यात आली आहे.
यापैकी भोसरी विधानसभा मतदारसंघासाठी चित्ररथाचे औपचारिक उद्घाटन
सहा.निवडणूक निर्णय अधिकारी रेश्मा माळी यांच्या हस्ते करण्यात आले.या प्रसंगी
सहा.आयुक्त डॉ. प्रवीण आष्टीकर, आण्णा बोदडे आणि स्वीप
समन्वयक अधिकारी ज्योत्स्ना शिंदे तसेच सर्व क्षेत्रीय अधिकारी उपस्थित होते.
यावेळी कला पथकांने मतदान जनजागृतीसाठी गीतासह नाटिका सादर करून मतदानाचे आवाहन
केले.
भोसरी विधानसभा मतदारसंघात ज्या मतदान केंद्रावर मतदान कमी झाले आहे अशा
परिसरामध्ये या चित्ररथ व कलापथकाद्वारे जनजागृती
करण्यात येणार आहे. याचाच भाग म्हणून तळवडे चौक, चिखली चौक,
मोशी, वडमुखवाडी आणि भोसरी याठिकाणी
चित्ररथाद्वारे जनजागृती करण्यात आली. या माध्यमातून निश्चितपणे मतदानाचा टक्का
वाढण्यास मदत होईल. असा विश्वास सहा.निवडणूक निर्णय अधिकारी रेश्मा माळी आणि
सहा.आयुंक्त प्रवीण आष्टीकर यांनी व्यक्त केला. याप्रसंगी स्वीप कक्षाचे
सहा.अधिकारी प्रदीप शिंदे, अविनाश वाळुंज, बाळासाहेब जाधव, क्षितीज शिंदे, मनोज मराठे, उपस्थित होते. जनसंपर्क विभागाचे मुख्य
लिपिक भोसले यांनी संयोजन केले.
चित्ररथ व कलापथक यांच्याद्वारे मतदान जनजागृतीची विशेष मोहीम
Reviewed by साप्ताहिक एकच ध्येय
on
April 15, 2019
Rating:

No comments: