Seo Services
Seo Services

मुल न होणे यावर आयुर्वेदिक उपचार व मोफत मार्गदर्शन

Related image

पिंपरी : डॉ.डी.वाय.पाटील आयुर्वेद रुग्णालय पिंपरी, पुणे येथे स्त्री रोग व प्रसुती तंत्र विभागाच्या वतीने दिनांक ६/४/३०१९ ते १३/४/३०१९ या आठ दिवसाच्या कालावधीत सकाळी ९.०० ते ४.०० या वेळेत वँध्यत्व (मुल न होणे) यावर मोफत मार्गदर्शन शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. विशेषतः यामध्ये पी.सि.ओ.डी., पाळी अनियमित होणे, वजन वाढणे, हार्मोन्स असंतुलित होणे या कारणामुळे वँधत्वाची लक्षणे प्रकर्षाने जाणवतात. तसेच पुरुषांमध्ये शुक्राणूंची संख्या कमी असणे. यामुळे संतती निर्माण होण्यासाठी अडथळा निर्माण होतो.

अनेक जण डॉक्टरांना भेटून आय.वि.एफ.सारखे महागडे उपचार करून घेतात आणि सर्वात शेवटी आयुर्वेदिक किंवा नैसर्गिक उपचारांनी काही होते का, हे आजमावण्यासाठी बरेच रुग्ण ओ.पी.डी. मध्ये येत असतात.

वँध्यत्व असणाऱ्या स्त्री व पुरुषांसाठी या सर्व सुविधा डॉ.डी.वाय.पाटील आयुर्वेद रुग्णालयात उपलब्ध आहेत, तसेच शरीर शुध्दीसाठी उपचार केले जातील. आतापर्यंत अनेक स्त्री-पुरुषांनी याचा उपयोग करून घेतला आहे व वँध्यत्वासाठी त्याचा लाभ झाला आहे.तरी गरजूंना आपले सगळे रिर्पार्टस घेऊन दिनांक ६/४/२०१९/ ते १३/४/२०१९ या कालावधीत सकाळी ९ ते ४ या वेळेत डॉ.डी.वाय.पाटील आयुर्वेद हॉस्पिटलमध्ये ओ.पी.डी.नंबर २ मध्ये यावे. या सवर्ण संधीचा लाभ घ्यावा. या संदर्भात अधिक माहितीसाठी (सौ.भारती मराठे) ८३२९१५२३९८ या नंबरवर फोन करावा.

मुल न होणे यावर आयुर्वेदिक उपचार व मोफत मार्गदर्शन मुल न होणे यावर आयुर्वेदिक उपचार व मोफत मार्गदर्शन Reviewed by साप्ताहिक एकच ध्येय on April 05, 2019 Rating: 5

No comments:

ads 728x90 B
Powered by Blogger.